अल्पसंख्यांक आयोग अध्यक्षांच्या पत्नीची पर्स लंपास
By admin | Published: September 23, 2016 07:36 PM2016-09-23T19:36:06+5:302016-09-23T19:36:06+5:30
अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष मो़हुसेन खान यांच्या पत्नीची पर्स चोरट्यांनी लांबवत सहा लाखांचा ऐवज लंपास केला़ डाऊन पटना एक्स्प्रेसमध्ये २१ रोजी रात्री ही घटना घडली.
ऑनलाइन लोकमत
भुसावळ, दि. 23 - अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष मो़हुसेन खान यांच्या पत्नीची पर्स चोरट्यांनी लांबवत सहा लाखांचा ऐवज लंपास केला़ डाऊन पटना एक्स्प्रेसमध्ये २१ रोजी रात्री ही घटना घडली. पाचोरा आल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले.
या घटनेने मोठी खळबळ उडाली असून रेल्वेतील वाढत्या चोऱ्यांमुळे रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांच्या कर्तव्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
मो़हुसेन खान हे पत्नीसह डाऊन १२१४१ एक्स्प्रेसच्या वातानुकूलित बोगी ए- २ च्या सीट क्रमांक १९ व २१ वरून मुंबई ते भुसावळ असा प्रवास करीत असतांना त्यांच्या पत्नीला झोप लागली़ पाचोरा आल्यानंतर त्यांना जाग आल्याने चोरट्यांनी डोक्याखाली ठेवलेली लेडीज पर्स लांबवल्याचे लक्षात आले़ पर्समध्ये तीन लाख ७० हजार रुपये किंमतीचे नऊ तोळ्यांचे कंगण, दिड लाखांचे पाच तोळ्यांचे सोन्याचे लॉकेट, ६० हजारांची दोन तोळ्यांची चैन व पाच हजार रुपये रोख व अन्य कागदपत्रे असा ऐवज होता़ एकूण पाच लाख ८५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबवली़ मो़हुसेन खान (मुक्ताईनगर) यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल करून तो चाळीसगाव पोलिसात वर्ग करण्यात आला़