" देवेंद्र फडणवीसांमुळे बिहारमध्ये चमत्कार घडला, हा प्रकाश तुमच्यामुळेच आमच्या डॊक्यात पडला..!" 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2020 06:53 PM2020-11-10T18:53:44+5:302020-11-10T19:05:47+5:30

भाजपाने या बिहार निवडणुकीची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर दिली होती.

"A miracle happened in Bihar due to Devendra Fadnavis, This light fell on our heads because of you ..!" | " देवेंद्र फडणवीसांमुळे बिहारमध्ये चमत्कार घडला, हा प्रकाश तुमच्यामुळेच आमच्या डॊक्यात पडला..!" 

" देवेंद्र फडणवीसांमुळे बिहारमध्ये चमत्कार घडला, हा प्रकाश तुमच्यामुळेच आमच्या डॊक्यात पडला..!" 

Next

पुणे : बिहार निवडणुक मत मोजणी सुरु असून त्यात एनडीएची वाटचाल बहुमताच्या दिशेने सुरु आहे. भाजपाने या बिहार निवडणुकीची जबाबदारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर दिली होती. आज जाहीर होत असलेल्या निवडणुकीत एनडीएला मिळत असलेल्या यशानंतर फडणवीस यांचे देखील कौतुक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र बिहार निवडणुकीतील  भाष्य करतानाच देवेंद्र फडणवीसांना या यशाचे श्रेय देण्याऐवजी चांगलाच चिमटा काढला आहे.

पुण्यात एका कार्यक्रमासाठी शरद पवार हे आले होते. त्यावेळी ते बोलत होते. शरद पवार म्हणाले, बिहारच्या निवडणुकीत आम्ही जाणीवपूर्वक लक्ष घातले नाही. तेजस्वीला फ्री हँड द्यायचा होता. यातूनच देशातील यंगस्टार्सना प्रेरणा मिळणार आहे. तसेच सुरु असलेल्या बिहार निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपाच्या जास्त जागा दिसत असले तरी पण नितीशकुमार यांचे मोठे नुकसान होईल असे जे वाटले होते तसे काही घडले नाही. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे बिहारमध्ये चमत्कार झाला हा प्रकाश आमच्या डोक्यात पत्रकारांमुळेच पडला आहे, अशा शब्दात पवारांनी फडणवीसांवर टिप्पणी केली. 

राज्यपाल भगतसिंग कोश्यारींवर निशाणा....  

राज्यपालांनी गृहमंत्र्यांना फोन करून अर्णव गोस्वामी यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली ते चांगले आहे. पण मला वाटते त्यांनी ज्यांच्या घरात दोन आत्महत्या झाल्या त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली असते तर ते अधिक चांगले झाले असते, अशा शब्दात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना टोला लगावला आहे. अन्वय नाईक कुटुंबियांसोबतचा सोशल मीडियावरचा माझा फोटो ५ वर्षांपूर्वीचा आहे, असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. 

पुढे पवार यांनी सांगितले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल घेतलेली भेट ही फक्त मी रयतची देणगी रक्कम देण्यासाठी होती. त्यात विधानपरिषद राजकारणावर कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. अमेरिकेचा निकाल स्वच्छ आहे. तरीही ट्रम्प मीच विजयी झालो असे म्हणत असतील तर ते त्यांच्या वयाला साजेसे नाही. राज्यपाल भगतसिंग कोश्यारींवर निशाणा....  

 

Web Title: "A miracle happened in Bihar due to Devendra Fadnavis, This light fell on our heads because of you ..!"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.