सभापतींच्या निवडणुकीत चमत्कार?
By admin | Published: September 28, 2014 01:06 AM2014-09-28T01:06:08+5:302014-09-28T01:06:08+5:30
विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती मोडित निघाली आहे. याचे पडसाद जिल्हा परिषदेच्या राजकारणात उमटणार असल्याने ४ आॅक्टोबरला होणाऱ्या सभापतिपदाच्या निवडणुकीत चमत्कार घडण्याची
जिल्हा परिषद : नवीन समीकरणाची चाचपणी
नागपूर : विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती मोडित निघाली आहे. याचे पडसाद जिल्हा परिषदेच्या राजकारणात उमटणार असल्याने ४ आॅक्टोबरला होणाऱ्या सभापतिपदाच्या निवडणुकीत चमत्कार घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्र होते. युती व घटकपक्ष सदस्यांच्या मदतीने भाजपने अध्यक्ष तर उपाध्यक्षपद शिवसेनेला देण्यात आले. परंतु सत्तेत वाटेकरी वाढल्याने शिवसेनेच्या वाट्याला उपाध्यक्षांचे एकच पद आले. चार सभापतींची निवड करताना शिवसेनेला सभापतिपद दिले जाईल अशी ग्वाही दिली होती. परंतु राज्यातील राजकीय घडामोडीचे पडसाद जि.प.च्या राजकारणात उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप -शिवसेनेची ताटातूट झाल्याने सभापतिपदाच्या निवडणुकीतही भाजप-सेनेचा घटस्फोट होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यातच बांधकाम समिती भाजपकडे असावी यासाठी पक्ष सदस्यांनी मोर्चेबांधणी के ल्याने शिवसेनेत अस्वस्थता वाढली आहे.
२१ सप्टेंबरला जि.प.च्या शिक्षण, कृषी व पशुसंवर्धन, आरोग्य, महिला व बालकल्याण आदी विभागाच्या सभापतीची निवड केली जाणार आहे. परंतु विशेष सभेपूर्वीच युतीत वाद निर्माण झाल्याने शिवसेनेचे उपाध्यक्ष शरद डोणेकर यांना बांधकाम समिती देण्याला सत्तापक्षातील काही सदस्यांनी उघड विरोध दर्शविला आहे. त्यांना कृषी समिती द्यावी, असा प्रस्ताव पुढे आला आहे.
सत्तेत सहभागी घटक पक्षाच्या सदस्यांना नाराज न करता त्यांना आश्वासनानुसार सभापतीपद दिले जाणार आहे. त्यामुळे बसपा, रिपाइं व गोंगपाच्या सदस्यांची सभापतिपदावर वर्णी लागणार आहे. बांधकाम व शिक्षण समिती भाजपकडे असावी, असा पक्ष सदस्यांचा आग्रह असल्याने सभापतींच्या निवडणुकीत उलटफेर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (प्रतिनिधी)