नम्रता सुभेदार यांना मिसेस महाराष्ट्र टॅलेन्टेड पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2016 01:21 AM2016-11-04T01:21:52+5:302016-11-04T01:21:52+5:30
‘मिसेस महाराष्ट्र २०१६ ब्यूटी पॅजेंट’ स्पर्धेत नम्रता सुभेदार (टांकसाळे) यांना मिसेस महाराष्ट्र टॅलेन्टेडचा पुरस्कार मिळाला आहे.
बारामती : पुणे रेसिडेन्सी क्लब येथे पार पडलेल्या ‘मिसेस महाराष्ट्र २०१६ ब्यूटी पॅजेंट’ स्पर्धेत नम्रता सुभेदार (टांकसाळे) यांना मिसेस महाराष्ट्र टॅलेन्टेडचा पुरस्कार मिळाला आहे.
राज्यातून ५०० महिला या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. त्यातून १८ महिलांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये ग्रामीण भागातून बारामतीच्या नम्रता सुभेदार यांची निवड करण्यात आली. स्पर्धेतील वेगवेगळ्या चाचण्या पार करून सुभेदार या पहिल्या १० मध्ये पोहोचल्या. टॅलेन्ट राऊंडमध्ये त्यांनी ‘शेतकऱ्याची आत्महत्या’ या विषयावर एकपात्री नाटक सादर केले. त्याला परीक्षक व प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. अंतिम फेरीत त्यांना मिसेस महाराष्ट्र टॅलेन्टेड हा किताब मिळाला. या वेळी त्या म्हणाल्या, ‘‘याचे श्रेय पती अभिजित सुभेदार व कुटुंबीय तसेच अंजना मस्कायनस, संगीता काकडे, प्रमोद मेडद यांना जाते. त्यांच्या सहकार्यामुळेच हे यश मिळाले.’’ (प्रतिनिधी)