सोनेखरेदीचा मुहूर्त आंदोलनामुळे चुकणार
By admin | Published: April 7, 2016 12:58 AM2016-04-07T00:58:03+5:302016-04-07T00:58:03+5:30
गुढीपाडवा या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या मुहूर्तावर सोने खेरदीचा मुहूर्त यंदा चुकणार आहे. अबकारी कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या बंदवर सर्व सराफ संघटना ठाम असल्याने या दिवशी
पुणे : गुढीपाडवा या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या मुहूर्तावर सोने खेरदीचा मुहूर्त यंदा चुकणार आहे. अबकारी कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या बंदवर सर्व सराफ संघटना ठाम असल्याने या दिवशी सोन्या-चांदीची सर्व दुकाने बंद राहणार आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत हा बंद सुरूच राहणार असल्याचे पुणे सराफ असोसिएशनने स्पष्ट केले आहे.
मागील ३६ दिवसांपासून सराफ सुवर्णकारांचा देशभर संप सुरू आहे. मंगळवारी दिल्लीत झालेल्या देशभरातील सराफ संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत बंद सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. बंदच्या काळात आजपर्यंत देशात १० तर महाराष्ट्रात ५ सुवर्णकारांनी आत्महत्या केल्या आहेत. तरीही सरकारवर काहीही परिणाम झालेला नाही. सरकार कोणत्याच प्रकारे आंदोलनाची दखल घेण्यास तयार नाही. याअगोदर २०१२ साली हा कायदा युपीए सरकारने लागू केला होता. त्यावेळी भाजपाने विरोध केला. त्यामुळे हा कायदा मागे घ्यावा लागला होता. आता हाच भाजपा तो कायदा उग्र स्वरूपात लागू करीत आहे. अर्थव्यवस्थेतील महत्वाचा घटक असलेल्या सराफ सुवर्णकार व्यवसायाबद्दल सरकारला काही देणे-घेणे नाही. आम्ही नाईलाजाने हे पाऊल उचलले आहे. ग्राहकांनी आमच्या भावना समजून घेऊन सहकार्य करावे, असे पुणे सराफ असोसिएशनने पत्रकात म्हटले आहे.
सराफ सुवर्णकार कोणताही कर भरण्यास तयार आहेत. किंबहूना १ टक्क्यापेक्षा १.५ टक्का कर इतर कोणत्याही मार्गाने भरण्यास तयार आहोत. परंतु हा जाचक कायदा
लादून घेणार नाही. आयात केलेले सोने देशातील २६ बँकांनाच विकण्याची परवानगी आहे. मात्र सराफ सुवर्णकारांकडे दुर्लक्ष केले जात आहे, अशी भुमिका असोसिएशनने मांडली आहे.