नागपुरातील बेपत्ता मुली भोपाळला सापडल्या
By admin | Published: June 26, 2016 12:04 AM2016-06-26T00:04:12+5:302016-06-26T00:04:12+5:30
गेल्या आठवड्यात बेपत्ता झालेल्या तीन मुली भोपाळला सापडल्या. एकीच्या फेसबूक फ्रेण्डने त्यांना भोपाळला बोलवून लॉजमध्ये ठेवून घेतले होते, असे प्राथमिक तपासात उघड झाले. शांतीनगरच्या
पाच दिवसांपूर्वी बेपत्ता : फेसबूक फे्रण्डने ठेवले होते लॉजमध्ये
नागपूर : गेल्या आठवड्यात बेपत्ता झालेल्या तीन मुली भोपाळला सापडल्या. एकीच्या फेसबूक फ्रेण्डने त्यांना भोपाळला बोलवून लॉजमध्ये ठेवून घेतले होते, असे प्राथमिक तपासात उघड झाले. शांतीनगरच्या पोलीस पथकाने त्यांना तेथून ताब्यात घेऊन नागपुरात आणले. शांतीनगरातील
एका महिलेने २१ जूनला शांतीनगर पोलीस ठाण्यात त्यांची १६ वर्षीय मुलगी आणि १९ वर्षीय पुतणी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी या दोघींचे मोबाईल लोकेशन तपासले असता त्या भोपाळला असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलीस उपायुक्त एम. राजकुमार, सहायक आयुक्त चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक सचिन धर्मेजवार, हवलदार उमा यादव , रमेश तायडे, नायक विजय दासरवार यांचे पथक भोपाळला रवाना झाले. त्यांनी भोपाळ पोलिसांशी संपर्क करून रेल्वे स्टेशन जवळच्या कपूर लॉजमध्ये या दोघी तसेच तहसीलमधील एक मुलगी अशा तिघींना ताब्यात घेतले. त्यांना तेथे बोलविणारे शूभम द्वारकाप्रसाद ठाकूर (वय १९) आणि धर्मेंद्र हरिप्रसाद रेकवार (वय २३, रा. भोपाळ) या दोघांनासुद्धा पोलिसांनी अटक केली.
दहावीत नापास झाल्यामुळे...!
यातील एक मुलगी भोपाळचा रहिवासी शूभम द्वारकाप्रसाद ठाकूर याची फेसबूक फ्रेण्ड होती. त्याच्यसोबत ती आॅनलाईन संपर्कात होती. दहावीत नापास झाल्याने ती अस्वस्थ झाली. तिने आपली मानसिक स्थिती शूभमला कळवली. शूभम आणि त्याचा मित्र धर्मेंद्र याच्याशी संगणमत करून तिला तिच्या मैत्रीणींसह भोपाळला बोलविले. तुमच्या खाण्याची, राहण्याची आणि नोकरी लागेपर्यंत शिक्षणाची व्यवस्था करण्याचेही आश्वासन दिले. त्यामुळे या तिघीही तेथे गेल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी या दोघांना अटक केली.