बेपत्ता महिला वैज्ञानिकाचा लागला शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2017 03:35 AM2017-01-28T03:35:46+5:302017-01-28T03:35:46+5:30

चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बीएआरसीच्या महिला वैज्ञानिकाचा अखेर शोध लागला आहे. पाँडेचेरी येथील आश्रमात मेडिटेशन केल्यानंतर

Missing woman scientist began searching | बेपत्ता महिला वैज्ञानिकाचा लागला शोध

बेपत्ता महिला वैज्ञानिकाचा लागला शोध

googlenewsNext

नवी मुंबई : चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बीएआरसीच्या महिला वैज्ञानिकाचा अखेर शोध लागला आहे. पाँडेचेरी येथील आश्रमात मेडिटेशन केल्यानंतर त्यांनी कुटुंबाशी संपर्क साधल्याची माहिती नेरुळ पोलिसांनी दिली. वरिष्ठांकडून जाच होत असल्याचा नातेवाइकांना ई-मेल पाठवल्यानंतर कुटुंब चिंतित होते.
भाभा अणुसंशोधन केंद्रातील महिला वैज्ञानिक बेपत्ता झाल्याची तक्रार नेरुळ पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. मनस्ताप असह्य झाल्यामुळे आपण निघून जात असल्याचा मेल त्यांनी केला होता. त्यावरून महिला वैज्ञानिक बबिता विजय सिंह बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. या तक्रारीनुसार नेरुळ पोलीस त्यांचा शोध घेत असतानाच गुरुवारी त्यांचे वास्तव्य पाँडेचेरी येथे असल्याचे उघड झाले. (प्रतिनिधी)

Web Title: Missing woman scientist began searching

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.