राज्यात राबविणार ‘मिशन ड्रोन’, देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 07:32 AM2023-06-21T07:32:04+5:302023-06-21T07:32:22+5:30
विविध विभागांचे उपक्रम आणि योजनांसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग करताना त्यांच्याशी समन्वय राखून काम करण्यासाठी ‘मिशन ड्रोन’ राबविले जाईल.
मुंबई : राज्य सरकारच्या प्रत्यक्ष फिल्डमध्ये काम करणाऱ्या विभागांचा समन्वय राखून ‘मिशन ड्रोन’ राबविण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
विविध विभागांचे उपक्रम आणि योजनांसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग करताना त्यांच्याशी समन्वय राखून काम करण्यासाठी ‘मिशन ड्रोन’ राबविले जाईल.
गृह, कौशल्य विकास, पशुसंवर्धन, आरोग्य, कृषी, आदिवासी विकास आदी क्षेत्रात ड्रोनद्वारे अनेक गोष्टी साध्य करता येतात. राज्यात काही ठिकाणी त्याचा वापर यापूर्वीही झाला आहे. पण, आता एक मिशन म्हणून ते राबविले जाईल.
सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीला अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, नितीन करीर, सचिव मनीषा म्हैसकर, प्रधान सचिव
आभा शुक्ला, पराग जैन आदी उपस्थित होते.
शेतीच्या विविध कामांचे पूर्ण चक्र आपण ‘मिशन ड्रोन’द्वारे संनियंत्रण करू शकतो. यासंदर्भातील एसओपी तयार करा, असे निर्देशही फडणवीस यांनी दिले. ‘आयआयटी’चे अधिष्ठाता मिलिंद अत्रे यांनी मिशन ड्रोनबाबत सादरीकरण केले.