मिशन इलेक्शन
By admin | Published: October 2, 2014 01:05 AM2014-10-02T01:05:51+5:302014-10-02T01:05:51+5:30
विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर जिल्हा निवडणूक यंत्रणा सक्रिय झाली आहे. नागपूर शहर आणि ग्रामीणमध्ये प्रत्येकी सहा असे विधानसभेचे एकूण १२ मतदारसंघ आहेत.
नागपूर: विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर जिल्हा निवडणूक यंत्रणा सक्रिय झाली आहे. नागपूर शहर आणि ग्रामीणमध्ये प्रत्येकी सहा असे विधानसभेचे एकूण १२ मतदारसंघ आहेत. जिल्ह्यात ३६ लाख ५७ हजार १५ मतदार असून त्यापैकी १७ लाख ५१ हजार ४३६ महिला मतदारांचा समावेश आहे.
यापैकी ३३ लाख ८३८७९ मतदारांकडे ओळखपत्र आहे. लोकसभेसाठी एकूण ४०५२ मतदान केंद्र राहणार आहे. त्यात २१५१ शहरात आणि १९०१ ग्रामीणमध्ये असतील. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत १९ संवेदनशील केंद्र होते. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ही संख्या ४४ होती. येत्या विधानसभा निवडणुकीत ही संख्या किती असेल हे नंतर ठरणार आहे,
मतदानासाठी एकूण १० हजार ईव्हीएमची आवश्यकता असून त्या प्रशासनाकडे उपलब्ध आहेत. मतदानासाठी ३३ हजार २३ कर्मचाऱ्यांची जुळवाजुळव करण्यात आली आहे. प्रत्यक्षात कामासाठी २३ हजार८१८ कर्मचाऱ्यांची गरज आहे.४५७ झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ६६ जणांना राखीव ठेवण्यात आले आहे. मतपेट्या नेण्या-आणण्यासाठी आणि इतरही कामासाठी ३८५ बसेस आणि ८९५ जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. पेड न्यूजवर लक्ष ठेवण्यासाठी माध्यम प्रमाणिकरण व देखरेख समिती (एमसीएमसी)ची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हास्तरावरील समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा आहेत. प्रत्येक मतदारसंघात सहायक निवडणूक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही समिती काम करणार आहे.