ध्येयनामा, वचननामा प्रकाशनाच्या तयारीत

By admin | Published: February 10, 2017 01:40 PM2017-02-10T13:40:57+5:302017-02-10T13:40:57+5:30

महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने नागरिकांच्या सूचनांच्या आधारे ‘ध्येयनामा’ तयार करण्याचे ठरविले

Mission, ready for publication of the affirmation | ध्येयनामा, वचननामा प्रकाशनाच्या तयारीत

ध्येयनामा, वचननामा प्रकाशनाच्या तयारीत

Next


नाशिक :
महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने नागरिकांच्या सूचनांच्या आधारे ‘ध्येयनामा’ तयार करण्याचे ठरविले असून, या ध्येयनाम्यात ४३ हजारांहून अधिक नागरिकांनी मतं मांडल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे. जनतेच्या सूचनांचा समावेश असलेला हा ध्येयनामा शुक्र वारी दुपारी १२ वाजता पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात प्रकाशित करण्यात येणार आहे, तर शिवसेनेच्या ‘वचननामा’तील अंतिम मसुदा तयार करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून, यास पक्षप्रमुखांकडून हिरवा कंदील मिळाल्यास शिवसेनेकडूनही आजच ‘वचननामा’ प्रकाशित होण्याचे संकेत आहे.
भाजपाने सुरुवातीला प्रभागनिहाय ध्येयनामा प्रकाशित करण्याचे नियोजन केले होते, परंतु काही तांत्रिक कारणाने ध्येयनामाचे प्रकाशन सोहळ्यात फेरबदल करण्यात आला असून, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात जाहीरनाम्याची प्रकाशन करण्यात येणार आहे.

Web Title: Mission, ready for publication of the affirmation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.