मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत लसीकरण मोहीम, ७ आॅक्टोबरपासून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 04:22 AM2017-10-02T04:22:45+5:302017-10-02T04:22:52+5:30

राज्यातील ९ जिल्हे व १३ महापालिका, नगरपालिका क्षेत्रांमध्ये ७ आॅक्टोबरपासून मिशन इंद्रधनुष्य योजनेंतर्गत लसीकरणाची मोहीम राबविण्यात येणार आहे.

Mission Vaccination campaign under the rainbow, starting from October 7th | मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत लसीकरण मोहीम, ७ आॅक्टोबरपासून प्रारंभ

मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत लसीकरण मोहीम, ७ आॅक्टोबरपासून प्रारंभ

मुंबई : राज्यातील ९ जिल्हे व १३ महापालिका, नगरपालिका क्षेत्रांमध्ये ७ आॅक्टोबरपासून मिशन इंद्रधनुष्य योजनेंतर्गत लसीकरणाची मोहीम राबविण्यात येणार आहे. लसीकरणाने टाळता येणाºया आजारामुळे बालमृत्यू होऊ नये तसेच राज्याचा बालमृत्यू दर कमी करण्यासाठी ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी केले. मिशन इंद्र्रधनुष्य मोहिमेचा आढावा घेण्यासाठी नुकतीच मंत्रालयात बैठक झाली. या वेळी मुख्य सचिवांनी जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्तांबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत आढावा घेतला.
राज्यात ९ जिल्हे व १३ महापालिका क्षेत्रांत ७ आॅक्टोबरपासून पुढील चार महिन्यांपर्यंत मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत ० ते २ वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे. सध्या महापालिका, नगरपालिका क्षेत्रामध्ये गृहभेटी देऊन बालकांना करण्यात आलेल्या लसीकरणाबाबतचे सर्वेक्षण केले जात आहे, ते येत्या दोन ते तीन दिवसांत पूर्ण करावे, असे निर्देश मुख्य सचिवांनी या वेळी दिले. राज्यातील १३ महापालिका क्षेत्रामध्ये ही मोहीम घेण्यात येणार आहे. ज्या महापालिका क्षेत्रात लसीकरणासंबंधी बालकांचा सर्व्हे अद्याप पूर्ण झालेला नाही तो तातडीने पूर्ण करावा. भिवंडी, मालेगाव या भागांमध्ये लसीकरण मोहिमेला प्रतिसाद चांगला मिळण्याकरिता नगरसेवक तसेच मौलवींची भेट घेऊन त्यांना सहभागी करून घ्यावे.
यासाठी जाणीव जागृतीवर मोठ्या प्रमाणात भर द्यावा. लसीकरणाने टाळता येणाºया आजारांमुळे बालमृत्यू होऊ नये यासाठी इंद्रधनुष्य मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन मुख्य सचिवांनी या वेळी केले.
७ आॅक्टोबरला ही मोहीम सुरू होणार असून दर महिन्याच्या ७ तारखेला ही मोहीम राबवली जाईल.

Web Title: Mission Vaccination campaign under the rainbow, starting from October 7th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.