‘एमकेसीएल’ची मक्तेदारी संपुष्टात
By admin | Published: September 5, 2015 01:07 AM2015-09-05T01:07:43+5:302015-09-05T01:07:43+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मातब्बर नेत्याशी संबंधित महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) कंपनीची प्रवेश प्रक्रिया, कर्मचारी भरती,
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मातब्बर नेत्याशी संबंधित महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) कंपनीची प्रवेश प्रक्रिया, कर्मचारी भरती, आज्ञावली विकास आदी कामांमधील मक्तेदारी संपुष्टात आणणारे आदेश उच्च व तंत्रशिक्षण विभागाने जारी केले आहेत.
या कंपनीत राज्य शासनाचे ३७.१३ टक्क्यांचे समभाग आहेत. तसेच या कंपनीचा अॅप्लीकेशन सर्व्हीस प्रोव्हायडर म्हणून समावेश केवळ ३० जून २००६ पर्यंत करण्यात आला होता. महालेखापालांनी केलेल्या परीक्षणात या कंपनीबरोबर केलेल्या सामंजस्य करारात
काही वित्तीय अनियमितता आढळून आल्या, याकडे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने लक्ष वेधले आहे. ‘एमकेसीएल’ला यापुढे प्रवेश प्रक्रिया, कर्मचारी भरती, आज्ञावली विकास इ. कामे थेट देऊ नये, कोणतेही सेवाविषयक काम देताना वित्तीय नियमाचे पालन करून सेवा घेण्यात यावी, या महामंडळाच्या सेवा घेतल्यास संबंधित कार्यालयाने सॉफ्टवेअर कोड व इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट त्यांच्याकडे हस्तांतरीत करण्याबाबत सामंजस्य करारात तरतूद करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. (विशेष प्रतिनिधी)