दोषींवर मकोका वा एमपीडीएची कारवाई!

By admin | Published: July 23, 2016 04:22 AM2016-07-23T04:22:38+5:302016-07-23T04:22:38+5:30

मुंबईत पावसामुळे १३३५ खड्डे पडले होते त्यातील फक्त ६६ खड्डे बुजविण्याचे बाकी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Mkoa or MPDA proceedings against guilty! | दोषींवर मकोका वा एमपीडीएची कारवाई!

दोषींवर मकोका वा एमपीडीएची कारवाई!

Next


मुंबई : मुंबईतील रस्ते बांधकाम घोटाळयाची व्याप्ती मोठी असल्यास तसेच संघिटतरित्या हा घोटाळा केल्याचे दिसून आल्यास त्यांच्या विरोधात या घोटाळ्यात सामील असलेल्यांविरुद्ध मकोका किंवा एमपीडीए अंतर्गत कारवाई करता येऊ शकते का या बाबत राज्य सरकारने विधी व न्याय विभागाचा सल्ला मागितला आहे. मुंबई महापालिकेने काळया यादीत टाकलेल्या कंत्राटदारांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचेही ते म्हणाले. मुंबईत पावसामुळे १३३५ खड्डे पडले होते त्यातील फक्त ६६ खड्डे बुजविण्याचे बाकी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील खड्डयांबाबतची लक्षवेधी सूचना काँग्रेसचे नीतेश राणे, भाजपाचे अमित साटम आदींनी मांडली होती. या घोटाळयाप्रकरणी दोन मुख्य अभियंत्यांना निलंबित करण्यात आले आह े, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी सांगितले. या लक्षवेधीच्या निमित्ताने भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, स्थायी समिती ही केवळ कोणते काम करायचे याचा निर्णय घेत असते. निविदा समिती ही फक्त अधिकाऱ्यांची असते. त्यामुळे स्थायी समितीला लक्ष्य करणे योग्य होणार नाही, अशी बॅटिंग शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी केली.
केबल्स टाकण्याच्या कामामुळे रस्ते खोदण्यात येत असल्याने यापुढे रस्त्यांच्या बाजूला ‘युटिलिटी कॉरिडॉर’ करता येईल का याचा विचार करण्यात येत असल्याचेही डॉ.पाटील म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
>तांत्रिक तपासणी सुरू
वाहतुकीचा जास्त ताण असणारे रस्ते सिमेंट काँक्रि टचे करण्याची सूचना राज्य सरकार महापालिकेला करेल. रस्त्यांची कामे ठराविक कंत्राटदारांनाच कशी मिळतात याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.आतापर्यंत २३५ रस्त्यांच्या कामांची चौकशी पूर्ण करण्यात आली आहे. रस्त्यांच्या कामांची तांत्रिक तपासणी सुरू आहे.

Web Title: Mkoa or MPDA proceedings against guilty!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.