हा तर नियतीचा खेळ! आमश्या पाडवींना पक्षप्रवेश देत एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 03:08 PM2024-03-17T15:08:10+5:302024-03-17T15:08:35+5:30

शिवसेनेचे खच्चीकरण होतंय, शिवसैनिकांचे खच्चीकरण होतंय, स्वत:च्या स्वार्थासाठी कुणी पक्ष इतरांच्या दावणीला बांधू शकत नाही असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं.

MLA Amshya Padavi joins Shiv Sena, Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray | हा तर नियतीचा खेळ! आमश्या पाडवींना पक्षप्रवेश देत एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला

हा तर नियतीचा खेळ! आमश्या पाडवींना पक्षप्रवेश देत एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला

मुंबई - कुणीही गेला तो गद्दार, चोर म्हणायचे. आम्हाला कचरा म्हणणाऱ्यांचा कचरा झाल्याशिवाय राहणार नाही हे मी बोललो होतो. हा नियतीचा खेळ आहे. खरेतर त्यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज होती. कोण चुकतंय हे पाहायला हवं होतं. आज आम्ही राज्यभर फिरतोय. विविध कार्यक्रम घेतो. तुडुंब गर्दी लोकांची असते. आपण घेतलेला निर्णय योग्य आहे हे वाटते. जर हा निर्णय योग्य नसता तर अनेकांनी आमच्याकडे पाठ फिरवली असती असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीउद्धव ठाकरेंना लगावला. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ज्यांच्यासोबत आम्ही अनेक वर्ष लढलो, त्यांच्यासोबत काम कसं करायचं हीच आमची भूमिका होती. २०१९ ला शिवसेना-भाजपा एकत्र निवडणूक लढलो. बाळासाहेब ठाकरे-नरेंद्र मोदी असे फोटो लावून लोकसभा, विधानसभा लढवल्या. परंतु निकालानंतर सर्व दरवाजे उघडे आहेत असं प्रमुख म्हणायला लागले. त्याचदिवशी महाराष्ट्राला जाणीव झाली डाळ मै कुछ काला है..लग्न एकाबरोबर, संसार दुसऱ्यासोबत हे राजकारणात चालत नाही. राजकारणात नीतीमत्ता, उद्देश, वैचारिक विचारधारा या पाळाव्या लागतात असं त्यांनी म्हटलं. 

तसेच शिवसेनेचे खच्चीकरण होतंय, शिवसैनिकांचे खच्चीकरण होतंय, स्वत:च्या स्वार्थासाठी कुणी पक्ष इतरांच्या दावणीला बांधू शकत नाही. आपल्याकडे लोकशाही आहे. अन्यायाविरोधात पेटून उठा असं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. तो मंत्र आम्ही आत्मसात केला. जेव्हा अती झालं तेव्हा बाळासाहेबांची शिवसेना काय आहे हे सर्वांनी पाहिले. आमश्या पाडवी तुम्ही आमचेच होते, आमचेच राहणार आहोत. विकासासाठी आपण एकत्र आलोय. तुमच्या भागातील विकासाला कुठेही कमी पडू देणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला. 

दरम्यान, आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आज शिवसेना धनुष्यबाण आपल्याकडे आहे. खरी शिवसेना आपलीच आहे. ज्या पक्षाकडे शिवसैनिकच नसतील त्यांना शिवसेना कसं म्हणू शकतो. आज शिवसैनिक आमच्यासोबत आहेत. ५० आमदार, १३ खासदार आणि विधान परिषदेचे ६ आमदार आपल्यासोबत आहेत. त्याचसोबत अनेक सरपंच, जिल्हा परिषद सदस्य असे शेकडो हजारो कार्यकर्ते आज आपल्यासोबत येतात. बाळासाहेबांच्या विचारांची साथ देतायेत. त्यामुळे २०१९ ला चुकीचा निर्णय कुणी घेतला हे जनतेला माहिती आहे असंही शिंदे यांनी सांगितले.

ज्यांच्याविरोधात लढलो आज त्यांचाच प्रचार करण्याची वेळ

नंदूरबारमध्ये अजूनही पूर्णत: विकास झाला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माझ्यासह सरपंच, जिल्हा परिषद सभापती, अनेक पदाधिकारी सहकाऱ्यांसह आज प्रवेश घेतला. नंदूरबार भागातला विकास व्हायला पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांची आग्रही मागणी होते. त्यामुळे ज्यांनी मला आमदार केले त्यांच्यासोबत गेले पाहिजे हे ठरवलं. काँग्रेससोबत आम्ही वर्षानुवर्षे लढत आलो. मात्र त्यांच्यासाठी आम्हाला प्रचार करावा लागणार अशी आमच्यावर जेव्हा वेळ आली तेव्हा शिवसेनेचे निष्ठावंत पदाधिकारी आम्ही इथं प्रवेश करतोय. माझ्या भागातील अनेक समस्या मी मुख्यमंत्र्यांकडे मांडली आहे. परिसरातील विकास आम्हाला करायचाय. आम्ही विश्वास ठेवून इथं आलोय. बाळासाहेबांच्या विचारांच्या मागे मी आलो आहे असं आमदार आमश्या पाडवी यांनी सांगितले. 
 

Web Title: MLA Amshya Padavi joins Shiv Sena, Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.