पक्षादेश असेल तर, पुतण्याचे काम करण्यास तयार : आमदार चिकटगावकर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2019 05:40 PM2019-07-06T17:40:44+5:302019-07-06T20:32:39+5:30
तर लोकांच्या मागणीवरून मी विधानसभेची उमेदवारी पक्षाकडे मागीतीली असल्याचे अभय चिकटगावकर म्हणाले होते.
मुंबई - वैजापूर विधानसभा मतदारसंघ चर्चेचा विषय बनला आहे. त्याचे कारण ही तसेच आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांचे पुतणे यांनी सुद्धा विधानसभेत रिंगणात उतरवण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे एकाच पक्षातून काका-पुतण्यांनी उमदेवारी अर्ज भरला आहे. तर पक्षाचे आदेश असेल तर माघार घेऊन पुतण्याचे काम करायला तयार असल्याचे प्रतिकिया भाऊसाहेब चिकटगावकर यांनी दिली आहे.
वैजापूर मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. २०१४ च्या लाटेत ही राष्ट्रवादीचे उमेदवार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी विजय मिळवला. आता पुन्हा त्यांनी विधानसभेसाठी पक्षाकडे उमेदवारी मागीतीली आहे. त्यातच त्यांचे पुतणे यांनी सुद्धा पक्षश्रेष्ठीकडे उमेदवारी मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. पक्षाने उमेदवारी दिली तर लढणारच असा दावा सुद्धा अभय पाटील यांनी केला आहे.
याला उत्तर देताना भाऊसाहेब चिकटगावकर म्हणाले की, अभय यांनी त्यांचा अर्ज केला आहे. मी माझा अर्ज केला आहे. पक्षश्रेष्ठी ठरवेल कुणला उमेदवारी द्यायची. पण आमच्यात उमेदवारीवरून कोणताही वाद नाही. तसेच जर पक्षाने सांगितले तर पुतण्याचे काम करायाला सुद्धा मी तयार असल्याचे भाऊसाहेब चिकटगावकर म्हणाले. उमेदवारी मिळाली नाही म्हणून बंडखोरी वैगरे मी करणार नसल्याचे ही भाऊसाहेब पाटील म्हणाले.
हेही वाचा काका-पुतण्याचे राजकीय युद्धाचे लोण आता औरंगाबादेत
तर लोकांच्या मागणीवरून मी विधानसभेची उमेदवारी पक्षाकडे मागीतीली असल्याचे अभय चिकटगावकर म्हणाले आहे. त्यामुळे आता काका-पुतण्याच्या राजकीय शर्यतीत कुणाच्या पदरात आमदारकीची उमेदवारी पडणार हे पाहणे उचित ठरेल.