या आमदारावर युवकाने केला जैविक वडील असल्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 05:42 AM2017-11-07T05:42:28+5:302017-11-07T05:42:39+5:30

‘शिवसेनेचे मागाठाणे विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वेच माझे जैविक बाबा आहेत,’ असा आरोप करत, राज कोरडे या युवकाने मुंबईत राजकीय वर्तुळात भूकंप केला आहे.

The MLA claimed to be a biological father on the MLA's behalf | या आमदारावर युवकाने केला जैविक वडील असल्याचा दावा

या आमदारावर युवकाने केला जैविक वडील असल्याचा दावा

Next

मुंबई : ‘शिवसेनेचे मागाठाणे विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वेच माझे जैविक बाबा आहेत,’ असा आरोप करत, राज कोरडे या युवकाने मुंबईत राजकीय वर्तुळात भूकंप केला आहे. सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राजने उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे सांगत, स्ुर्वे यांच्या डीएनए टेस्टची मागणीही केली आहे.
राजची आई आणि सुर्वे यांच्या कथित पत्नी उज्ज्वला यांनीही सुर्वेंविरोधात गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या की, १९८९ साली सुर्वे यांनी वजे्रश्वरी येथे लग्न केले. मात्र, दुसºया ठिकाणी लग्न ठरल्यावर माझी व मुलाची जबाबदारी नाकारली. मुलगा लहान असल्याने माझा विरोध तोकडा पडला. मात्र, आता तो मोठा झाल्याने, हक्कासाठी पुढे आले आहे. सुर्वे यांची मालमत्ता नको असून, केवळ त्यांचे नाव मुलाला देण्याची मागणी उज्ज्वला यांनी केली, तर राज याने सुर्वे यांच्या साथीदाराने बंदूक दाखवून धमकावले असून, डीएनए टेस्टसाठी आपले रक्त काढल्याचा आरोप केला. म्हणूनच उच्च न्यायालयात धाव घेत सुरक्षेसह सुर्वे यांच्या डीएनए टेस्टची मागणी केल्याचे त्याने स्पष्ट केले.

सुर्वे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या प्रतिक्रियेत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपली राजकीय प्रतिमा मलीन करण्यासाठी हे षडयंत्र असल्याचे स्पष्टीकरण सुर्वे यांनी दिले आहे. शिवाय खोटे आरोप करणाºयांविरोधात अब्रू नुकसानीचा खटला भरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून, सर्व आरोपांना तेथेच प्रत्युत्तर देत सत्य समोर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Web Title: The MLA claimed to be a biological father on the MLA's behalf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.