Ravi Rana: "संजय राऊत चवन्नीछाप माणूस आहे", रवी राणा यांची शेलक्या शब्दात टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2022 11:41 AM2022-05-08T11:41:23+5:302022-05-08T11:41:33+5:30

Ravi Rana: "उद्धव ठाकरे सरकार एका महिलेला घाबरल्याने त्यांनी एवढी सक्तीची कारवाई केली."

MLA Ravi Rana criticizes Shivsena MP Sanjay Raut and Mahavikash govt | Ravi Rana: "संजय राऊत चवन्नीछाप माणूस आहे", रवी राणा यांची शेलक्या शब्दात टीका

Ravi Rana: "संजय राऊत चवन्नीछाप माणूस आहे", रवी राणा यांची शेलक्या शब्दात टीका

Next

मंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा करणाऱ्या राणा दाम्पत्याची राजद्रोहाच्या गुन्ह्यातून 12 दिवसांनी जामिनावर सुटका करण्यात आली. त्यानंतर खासदार नवनीत राणा यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना रवी राणा यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

'संजय राऊत चवन्नीछाप माणूस...'
माध्यमांशी संवाद साधताना राणी म्हणाले की, "मी कोर्टाच्या निर्णयाचा आदर करतो, कोर्टाने जो निर्णय दिला त्याचे आम्ही पालन करणार आहोत. राजद्रोहाचा गुन्हा चुकीचा असल्याचे कोर्टाने सांगितल्यानंतरही त्यावर आक्षेप घेण्याचे काम संजय राऊत यांनी केले आहे. संजय राऊत चवन्नीछाप माणूस आहे. आम्हाला 20 फूट खोल गाडण्याची धमकी देतात, त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही. पण हनुमानाचे नाव घेतल्यावर आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल होतो हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे," असे राणा म्हणाले.

'सरकार एका महिलेला घाबरले'
ते पुढे म्हणातात की, "पोलीस आमच्या घरी आले होते तेव्हा आमच्यासोबत पोलीस स्टेशनला चला तुम्हाला जामीन देण्यात येईल असे सांगितले. आम्ही वॉरंट मागत असतानाही त्यांनी तफकाफडकी आम्हाला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा गाडीत बसताना शिवसैनिकांनी आमच्यावर दगड, पाण्याच्या बाटल्या फेकल्या. त्याच्यावर कारवाई केली नाही. आम्हाला पोलीस ठाण्यात नेऊन चहा पाजला. त्यानंतर रात्री सांताक्रूझला लॉकअपमध्ये ठेवल्यानंतर आम्हाला पाणीसुद्धा दिले नाही. उद्धव ठाकरे सरकार एका महिलेला घाबरल्याने त्यांनी एवढी सक्तीची कारवाई केली," अशी टीकाही रवी राणांनी केली.

'रावणाचा अहंकार टिकला नाही'
ते पुढे म्हणतात की, "मुख्यमंत्र्यांमध्ये अहंकार असेल, तर एक लक्षात ठेवा रावणाचा सुद्धा अहंकार टिकला नाही. रामाने त्याचा सर्वनाश केला. अहंकारने मुख्यमंत्री सत्तेचा गैरवापर करत आहेत, त्यामुळे रावणाचे जे झाले तेच यांचेही होईल. संजय राऊत, अनिल परब आणि मुख्यमंत्री यांच्यामार्फत झालेल्या भ्रष्टाचाराच्या फाईल्सबाबत केंद्र सरकारने कारवाई केली पाहिजे. सत्तेचा दुरुपयोग करणारे उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही मागणी आम्ही दिल्लीकडे करणार आहोत," असेही राणा म्हणाले.
 

Web Title: MLA Ravi Rana criticizes Shivsena MP Sanjay Raut and Mahavikash govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.