इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्याकडे दुर्लक्ष करायला पाहिजे: रवी राणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 12:44 PM2020-02-19T12:44:10+5:302020-02-19T12:45:54+5:30
महाराष्ट्रामध्ये इंदोरीकर महाराज यांचे प्रबोधन म्हणजेच सत्य बोलणार एक चालत-बोलत वाचनालय आहे.
मुंबई : गर्भलिंगनिदान कसे करावे? याबाबत प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर हे कीर्तनातून भाष्य करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. त्यांनतर आता यावरूनच राजकीय प्रतिक्रिया येत असून, इंदोरीकर महाराजांनी गर्भलिंगनिदाबाबत केलेल्या त्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करायला पाहिजे आणि आम्ही त्यांच्यासोबत ठामपणे उभा असल्याच आमदार रवी राणा म्हणाले आहे.
गर्भलिंगनिदान कसे करावे? याबाबत इंदोरीकर यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्याबाबत समर्थक आणि विरोधक यांचे अक्षरशः शाब्दिक युद्ध पेटले आहे. याच विषयावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही कारवाईची मागणी केली आहे. याच विषयावर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी इंदोरीकर यांच्या विरोधात भूमिका घेतली. तर याचे पडसाद आता राजकीय वर्तुळात सुद्धा उमटताना पाहायला मिळत आहे.
याप्रकरणी अनेक राजकीय नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तर अमरावती जिल्ह्याचे बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांनी सुद्धा यावर आपली प्रतिक्रिया दिली असून, आम्ही इंदोरीकर महाराज यांच्यासोबत ठामपणे उभा असल्याच ते म्हणाले आहे.
महाराष्ट्रामध्ये इंदोरीकर महाराज यांचे प्रबोधन म्हणजेच सत्य बोलणार एक चालत-बोलत वाचनालय आहे. त्यामुळे एखाद वाक्य एखाद्या महाराजांच्या कीर्तनातून निघालाही असेल तर त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीची सत्यता कीर्तनाच्या माध्यमातून मांडणाऱ्या इंदोरीकर महाराजांची आज समाजाला गरज असून, आम्ही त्यांच्यासोबत असल्याचेही राणा म्हणाले.