आ. रोहित पवारांच्या साखर कारखान्याला दंड; साडेचार लाख रुपयांचा दंड ठोठावला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 05:49 AM2023-05-05T05:49:33+5:302023-05-05T05:50:33+5:30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीने राज्यातील साखर कारखान्यांचा यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबर २०२२ पासून सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता.

MLA Rohit Pawar's sugar factory fined; The accusations were made by starting the filter before the deadline | आ. रोहित पवारांच्या साखर कारखान्याला दंड; साडेचार लाख रुपयांचा दंड ठोठावला

आ. रोहित पवारांच्या साखर कारखान्याला दंड; साडेचार लाख रुपयांचा दंड ठोठावला

googlenewsNext

पुणे - राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या शेटफळगढे (ता. इंदापूर) येथील बारामती ॲग्रो लि. साखर कारखान्याने मुदतीपूर्वीच गाळप हंगाम सुरू केल्याप्रकरणी साखर आयुक्तालयाने साडेचार लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याबाबत भाजपचे आमदार राम शिंदे यांनी तक्रार केली होती. त्यानुसार, कारखान्याच्या कार्यकारी संचालकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीने राज्यातील साखर कारखान्यांचा यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबर २०२२ पासून सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, बारामती ॲग्रो लि. साखर कारखान्याने गाळप हंगामाचा परवाना न घेता आधीच गाळप सुरू केल्याचा आरोप शिंदे यांनी केला होता. याप्रकरणी कारखान्याचे कार्यकारी संचालक सुभाष गुळवे यांच्याविरोधात भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. साखर आयुक्तालयातील विशेष लेखापरीक्षक यांच्यामार्फत चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, अहवालात विसंगती आढळल्याने लेखापरीक्षकांवर निलंबनाची कारवाईही करण्यात आली होती. 

कारखान्याने मुदतीपूर्वी गाळप हंगाम सुरू केला की नाही, हे चौकशीत सिद्ध झाले नाही. मात्र, साडेचार लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. - शेखर गायकवाड, आयुक्त, साखर.

Web Title: MLA Rohit Pawar's sugar factory fined; The accusations were made by starting the filter before the deadline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.