मीच काय बागडे नानानी ही घेतली पाच एकर जमीन: आमदार भुमरे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 04:12 PM2019-09-14T16:12:10+5:302019-09-14T16:19:48+5:30

नेहमीच चर्चेत असलेले पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांनी पुन्हा नवीन वादग्रस्त विधान केलं आहे.

MLA Sandeepan Bhumre arraignment Haribhau Bagade | मीच काय बागडे नानानी ही घेतली पाच एकर जमीन: आमदार भुमरे

मीच काय बागडे नानानी ही घेतली पाच एकर जमीन: आमदार भुमरे

googlenewsNext

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या आधीच राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाली आहेत. पैठण मतदारसंघाचे विद्यमान आमदार संदीपान भुमरे यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यावर टीका  करताना राजकीय पुढाऱ्यांनी मोठ्याप्रमाणावर जागा घेतल्या असल्याचा आरोप केला. एवढच नाही तर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सुद्धा पाच एकर जमीन घेतल्याचा दावा त्यांनी केला. मतदारसंघातील एका गावभेटी दरम्यान ते बोलत होते.

नेहमीच चर्चेत असलेले पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांनी  आता नवीनच  आरोप केला आहे. राजकीय नेत्यांनी किती आणि कुठे जमिन्या खरेदी केल्या आहेत याचा खुलासच त्यांनी भर सभेत करून टाकला. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बद्रीनारायण भुमरे  यांनी संदीपान भुमरे यांच्यावर शाळेच्या नावाने जमीन बळकावली असल्याचा आरोप केला होता. त्यावर बोलताना भुमरे म्हणाले की, माझ्यावर काय आरोप करतात, या भागात इतरही पुढाऱ्यांनी मोठ्याप्रमाणावर जमिनी घेतल्या आहेत.

मी तरी शाळेसाठी २ एकर जमीन घेतली,पण काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांनी १०० एकर जमिनी घेतली होती. तर आता नुकतेच विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी चित्तेपिपळगावात ५ एकर जमीन घेतली असल्याचा दावा त्यांनी केला. अशा अनेक पुढाऱ्यांनी परिसरात मोठ्याप्रमाणावर जमिनी घेतल्या असल्याचे सुद्धा ते म्हणाले. त्यांच्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Web Title: MLA Sandeepan Bhumre arraignment Haribhau Bagade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.