पक्ष ही तुमची मालकी नव्हती...; संजय शिरसाट यांचा उद्धव ठाकरे गटावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 12:14 PM2023-10-06T12:14:18+5:302023-10-06T12:14:58+5:30

घरच्या माणसांना बोगस कंपन्या काढून त्यात गुंतवावे, त्यामाध्यमातून लूट करायची हे समोर येत आहे असा आरोप संजय राऊतांनी केला.

MLA Sanjay Shirsat targets Uddhav Thackeray-Sanjay Raut | पक्ष ही तुमची मालकी नव्हती...; संजय शिरसाट यांचा उद्धव ठाकरे गटावर हल्लाबोल

पक्ष ही तुमची मालकी नव्हती...; संजय शिरसाट यांचा उद्धव ठाकरे गटावर हल्लाबोल

googlenewsNext

मुंबई – संजय राऊत आणि राष्ट्रवादीचा संबंध काय? उबाठा गटात एक बालबुद्धी आणि दुसरा बैलबुद्धी यांचा जो भरणा झालाय त्यांना चिंता जास्त आहे. निवडणूक आयोगावर टीका कशी करता येईल ही घाई झालीय. त्यांच्या नादानपणे हा पक्ष फुटलाय हे माहिती आहे. संजय राऊतांचे वक्तव्ये गांभीर्याने घेणारे नसते. अजित पवारांनी सर्व शपथपत्रे दाखल केलीत. निकाल काय लागेल हे निवडणूक आयोगाला ठरवू द्या. बेताल वक्तव्ये करू नका, पक्षात हुकुमशाही चालते तशी बाहेर चालेल असं त्यांना वाटते. पक्ष ही तुमची मालकी नव्हती अशा शब्दात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला.

आमदार संजय शिरसाट म्हणाले की, लोकांनी आमच्या दरवाजात आले पाहिजे असं यांना वाटते. त्यांना लोकांमध्ये फिरायचे नसते. त्यांना चिंता महाराष्ट्राची नाही. हा मुख्यमंत्री इतका फिरतो कसा असं त्यांना वाटते. दुसऱ्यांना टोमणे देणे याशिवाय काम काय आहे? प्रत्येक गोष्टीवर बारकाईने मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री लक्ष देतात. राजकारण यांचा धंदा आहे, आमचा नाही. आज जी काही बडबड केली, कोरोना काळात आम्ही ४० लोकं रस्त्यावर होतो. तुम्ही होता का? केवळ राजकारण करायचे असते अशी टीका त्यांनी केली.

तसेच घरच्या माणसांना बोगस कंपन्या काढून त्यात गुंतवावे, त्यामाध्यमातून लूट करायची हे समोर येत आहे. २०-२५ कंपन्या संजय राऊतांच्या नावावर आहेत. जेव्हा या सर्व गोष्टीची चौकशी होईल तेव्हा त्यांना जेलमध्ये जाण्याशिवाय मार्ग नाही. आरोपीच्या सांगण्यावरून डीजी नेमला जातो का? एका महिलेला पहिल्यांदा महाराष्ट्राचे डीजी होण्याचा मान मिळतोय हे आमच्यासाठी आनंददायी आहे असंही आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं.

दरम्यान, २०२४ ला प्रत्येक पक्षाचा नेता आपलाच मुख्यमंत्री होईल यासाठी सांगतो जेणेकरून कार्यकर्त्यांमध्ये जोर आला पाहिजे. प्रफुल पटेल बोलले, आम्ही तर १०० टक्के सांगतो आमचा मुख्यमंत्री आहे आणि तेच पुढे राहणार आहेत. भाजपाचे लोक तेच म्हणतायेत. युतीचा मुख्यमंत्री होईल असं विधान रवींद्र चव्हाण यांच्याकडून अपेक्षित आहे असंही शिरसाट यांनी सांगितले.

Web Title: MLA Sanjay Shirsat targets Uddhav Thackeray-Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.