आमदारांनी रोखली देवगिरी एक्स्प्रेस
By admin | Published: June 16, 2015 03:03 AM2015-06-16T03:03:16+5:302015-06-16T03:03:16+5:30
एजंटांकडून तिकीट कन्फर्म झाले तरी रेल्वेत बसेपर्यंत आसन क्रमांक मिळत नाही,अशी तक्रार करत मराठवाड्यातील ११ आमदार, माजी मंत्री व माजी खासदारांनी देवगिरी एक्स्प्रेस दीड तास रोखली.
नांदेड : एजंटांकडून तिकीट कन्फर्म झाले तरी रेल्वेत बसेपर्यंत आसन क्रमांक मिळत नाही,अशी तक्रार करत मराठवाड्यातील ११ आमदार, माजी मंत्री व माजी खासदारांनी देवगिरी एक्स्प्रेस दीड तास रोखली. सोमवारी सायंकाळी नांदेड स्थानकावर हा प्रकार घडला.
नांदेड स्थानकातून रोज सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी सुटणारी देवगिरी एक्स्प्रेस सोमवारी ७.४० वाजता सुटली. या रेल्वेतून प्रवास करणारे आ. हेमंत पाटील, आ. वसंतराव चव्हाण, आ. डी. पी. सावंत, आ. सुभाष साबणे, माजीमंत्री आ. जयप्रकाश मुंदडा, आ. विजय भांबळे, माजी खासदार डी. बी. पाटील, माजी आमदार ठक्करवाड यांच्यापैकी बहुतेक जणांचे तिकीट कन्फर्म झालेले नव्हते. माजी नगराध्यक्ष नरेंद्रपाल बरारा हे आजारी असल्याने व्हिल चेअरवरुन आलेले होते. त्यांना तर अप्पर बर्थ देण्यात आला.