मंत्रालयाला टाळे ठोकणाऱ्या आमदारांना पोलिसांनी घेतले ताब्यात; व्हॅनमधून नेले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 12:11 PM2023-11-01T12:11:14+5:302023-11-01T12:11:41+5:30

मराठा आरक्षणाचे आंदोलन नाजूक अवस्थेमध्ये पोहोचले आहे. सुरुवातीला आरक्षणावर चकार शब्द न काढणारे आमदार घरांच्या आंदोलनाची धग बसली आणि त्यानंतर राजकीय भीतीने ते राजीनामे आणि आंदोलनाला बसू लागले आहेत.

MLAs who locked the Ministry, Mantralay Gate were detained by the police; Taken in a van latest Update on Maratha Reservation | मंत्रालयाला टाळे ठोकणाऱ्या आमदारांना पोलिसांनी घेतले ताब्यात; व्हॅनमधून नेले

मंत्रालयाला टाळे ठोकणाऱ्या आमदारांना पोलिसांनी घेतले ताब्यात; व्हॅनमधून नेले

मराठा आरक्षणावरून कालपासून विधानसभा आणि मंत्रालयासमोर आंदोलन करणाऱ्या आमदारांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आमदारांनी काही वेळापूर्वीच मंत्रालयाच्या गेटना टाळे ठोकून पायऱ्यांवरच आंदोलनाला बसले होते. या सर्वपक्षीय आमदारांना पोलिसांनी व्हॅनमध्ये घालून नेले आहे. 

मराठा आरक्षणाचे आंदोलन नाजूक अवस्थेमध्ये पोहोचले आहे. सुरुवातीला आरक्षणावर चकार शब्द न काढणारे आमदार घरांच्या आंदोलनाची धग बसली आणि त्यानंतर राजकीय भीतीने ते राजीनामे आणि आंदोलनाला बसू लागले आहेत. यातच कालपासून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे आमदार, ठाकरे गटाचे आमदार विधानसभेच्या आवारात आंदोलनाला बसले होते. आज त्यांनी मंत्रालयाला टाळे ठोकले आहे. 

मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलवावे, अशी मागणी या आमदारांनी केली आहे. यामध्ये राजू नवघरे, अमोल मिटकरी, राहुल पाटील, कैलास पाटील, विक्रम काळे, चेतन तुपे, बाबासाहेब आजबे, यशवंत माने, निलेश लंके , बाळासाहेब पाटील, दिलीप बनकर, बाबाजानी दुर्रानी, मोहन उबर्डे यांचा समावेश आहे.  

राज्यभरात मराठा आरक्षण मिळण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा वणवा भडकलेलाच असून, बीड, धाराशिवमध्ये संचारबंदी तर  जालन्यामध्ये इंटरनेटबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी रास्ता रोको, आमरण उपोषण करण्यात आले. आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्येचे सत्र सुरूच असून, मंगळवारी दिवसभरात सात जणांनी मृत्यूला कवटाळले. यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली. मराठा आंदोलनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत असून, आरक्षणप्रश्नी तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. 

Web Title: MLAs who locked the Ministry, Mantralay Gate were detained by the police; Taken in a van latest Update on Maratha Reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.