पंकजा यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर; मुंडे भाऊ-बहिण भविष्यात एकत्र दिसणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 12:12 PM2022-08-29T12:12:47+5:302022-08-29T12:13:31+5:30

एकनाथ खडसे, गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्यांनी भाजपा वाढवला. परंतु ज्यारितीने तिकीट द्यायचं आणि त्यांनाच पाडायचं सूडाचं राजकारण भाजपानं केले असा आरोप आमदार अमोल मिटकरींनी केला.

MLC Amol Mitkari, Supriya Sule offered BJP Leader Pankaja Munde to join NCP, Girish Mahajan Targeted NCP | पंकजा यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर; मुंडे भाऊ-बहिण भविष्यात एकत्र दिसणार?

पंकजा यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर; मुंडे भाऊ-बहिण भविष्यात एकत्र दिसणार?

Next

मुंबई - राज्यात भाजपा सरकार आल्यापासून पुन्हा एकदा मुंडे समर्थकांनी पंकजा मुंडे यांची मंत्रिपदावर वर्णी लागावी अशी मागणी केली आहे. परंतु मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात पंकजा मुंडे यांना स्थान न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज झाले. पंकजा मुंडे यांना सुरुवातीला विधान परिषद उमेदवारी आणि आता मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा सातत्याने पुढे येत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पंकजा यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. 

अमोल मिटकरी म्हणाले की, एकनाथ खडसे, गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्यांनी भाजपा वाढवला. परंतु ज्यारितीने तिकीट द्यायचं आणि त्यांनाच पाडायचं सूडाचं राजकारण भाजपानं केले. ते रोहिणी खडसेंच्या लक्षात आले. पंकजा मुंडे यांच्याही ते लक्षात आले पाहिजे. आपल्या पक्षाला वाढवण्याचं प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांचे पंख कसे छाटतात. तुमच्या पक्षात तुम्हाला भाजपा बाजूला कसं ठेवतंय हे तुम्ही ओळखणं गरजेचे आहे असं सांगत मिटकरींनी अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली. 

तर गोपीनाथ मुंडे हे वेगळ्या पक्षात असले तरी त्यांची महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात वेगळी ओळख आहे. आमचे अनेक वर्षांचे संबंध होते. जरी विरोधक असला तरी वैयक्तिक संबंध पाळले पाहिजे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. परंतु आता कटुता वाढताना दिसते हे दुर्देवी आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. जर मिटकरींनी चांगला विचार मांडला असेल तर पक्ष जरूर त्याचा विचार करेल. पंकजा मुंडे कुठल्याही पक्षात राहिल्या तरी त्यांच्या कुटुंबीयांना माझ्या शुभेच्छा आणि प्रेम कायम असेल असं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. 

पंकजा मुंडे नाराज हे कपोकल्पित - भाजपा      
दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या प्रतिक्रियेवर भाजपानं हल्लाबोल केला. राष्ट्रवादी असो किंवा शिवसेना कुणाला काहीही म्हणू द्या, भाजपात अंतर्गत वाद नाही. पंकजा मुडे नाराज आहेत. पंकजा या पक्षात जाणार तिथे जाणार असा कुठेही विषय नाही. हे सगळं कपोकल्पित आहे. पण मनातील खेळ सुरू आहे असं सांगत मंत्री गिरीश महाजनांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना टोला लगावला. 

Web Title: MLC Amol Mitkari, Supriya Sule offered BJP Leader Pankaja Munde to join NCP, Girish Mahajan Targeted NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.