एमएमआरडीएचा नियंत्रण कक्ष सज्ज

By Admin | Published: June 15, 2016 03:28 AM2016-06-15T03:28:27+5:302016-06-15T03:28:27+5:30

पावसाळ््यादरम्यान झाडांची पडझड, पाणी साचणे याचबरोबर वाहतूककोंडी टाळण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) जय्यत तयारी केली आहे. पावसाळ््यात

The MMRDA's control panel is ready | एमएमआरडीएचा नियंत्रण कक्ष सज्ज

एमएमआरडीएचा नियंत्रण कक्ष सज्ज

googlenewsNext

मुंबई : पावसाळ््यादरम्यान झाडांची पडझड, पाणी साचणे याचबरोबर वाहतूककोंडी टाळण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) जय्यत तयारी केली आहे. पावसाळ््यात जनतेच्या तक्रारी निवारण्यासाठी एमएमआरडीएचे पावसाळी नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत राहणार असून, मुंबई महापालिका आणि पोलिसांच्याही संपर्कात राहणार आहे.
एमएमआरडीएद्वारे राबवण्यात येत असलेल्या प्रकल्पांच्या परिसरात पावसाळ्यादरम्यान होणारी वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहे. प्राधिकरणाचे प्रकल्प सुरू असलेल्या ठिकाणी पाणी साचू नये, वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी तक्रार आल्यास, त्यावर तातडीने उपाय करण्याच्या सूचनाही कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. कंत्राटदारांना सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची तंबी एमएमआरडीएने दिली आहे. यात प्रकल्पांच्या बांधकामाच्या ठिकाणी बॅरिकेडिंग करणे, खराब झालेल्या रस्त्यांची डागडुजी करणे, रस्त्यावर साचणाऱ्या चिखलाची विल्हेवाट लावणे या सूचनांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)

हेल्पलाइन
एमएमआरडीएकडून ०२२-२६५९१२४१, ०२२-२६५९४१७६ आणि ८०८०७०५०५१ हे दूरध्वनी क्रमांक मदतीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत, तर प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता जे.आर. ढाणे नियंत्रण कक्षाचे मुख्य अधिकारी म्हणून काम पाहणार असून, ०२२-२६५९५९३३ संपर्क क्रमांक उपलब्ध करण्यात आला आहे.

Web Title: The MMRDA's control panel is ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.