Pune Bypoll Election 2023: पुण्यात मनसेला मोठे खिंडार; ७ जणांच्या हकालपट्टीनंतर ५० जणांचे राजीनामे 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 11:17 PM2023-02-23T23:17:50+5:302023-02-23T23:18:22+5:30

Pune Bypoll Election 2023: पुण्यात निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच मनसेने ७ जणांची हकालपट्टी केली होती.

mns 50 workers resign after expulsion of 7 party office bearers in pune bypoll election 2023 | Pune Bypoll Election 2023: पुण्यात मनसेला मोठे खिंडार; ७ जणांच्या हकालपट्टीनंतर ५० जणांचे राजीनामे 

Pune Bypoll Election 2023: पुण्यात मनसेला मोठे खिंडार; ७ जणांच्या हकालपट्टीनंतर ५० जणांचे राजीनामे 

googlenewsNext

Pune Bypoll Election 2023: राज्यातील राजकारण अनेकविध मुद्द्यांवरून तापल्याचे दिसत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबत शिंदे गटाच्या बाजूने दिलेला निकाल, माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेला दावा आणि कसबा आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा प्रचार यामुळे आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. मात्र, ऐन निवडणुकीच्या काळात मनसेला खिंडार पडल्याचे सांगितले जात आहे. 

महाविकास आघाडीकडून वरिष्ठ नेत्यांपासून ते तरुण नेत्यांपर्यंत सर्वच नेते या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. आमदार रोहित पवार, नाना पटोले, अजित पवार हे मैदानात उतरले आहेत. त्यासोबतच भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्यासाठी भाजपचे नेते जोमाने प्रचार यात्रेत उतरले आहेत. भाजपकडून देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, रविंद्र चव्हाण, गिरीश महाजन प्रचारासाठी तळ ठोकून आहेत. यातच मनसेच्या ७ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली. यामुळे ५० जणांनी राजीनामे दिल्याचे सांगितले जात आहे. 

महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा केला प्रचार
 
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरू आहे. भाजपचे हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांच्यातच मुख्य लढत होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी न देता भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. मात्र मनसेचे कसबा विधानसभा मतदारसंघातील सात कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार केल्याने रवींद्र खेडेकर, सागर पांगारे, गोपी घोरपडे, अनिल चांदांगे, रिझवान बागवान, प्रकाश ढमढेरे, नीलेश निकम यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर कसबा विधानसभा मतदारसंघातील चाळीस ते पन्नास जणांनी राजीनामे दिले. राजीनामा पक्षाच्या शहराध्यक्षांकडे पाठविण्यात आला आहे. कसब्यात मनसेला खिंडार पडल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे, राजेंद्र वागसकर यांच्या आदेशाने पक्षविरोधी काम करणाऱ्या या सर्वांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारफेरीमध्ये कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांवरती नजर ठेवून असलेल्या काही व्यक्तींनी राज ठाकरेंना माहिती पुरविली आणि रवींद्र खेडेकर आणि प्रकाश ढमढेरे यांच्यासह सात पदाधिकाऱ्यांना बडतर्फ केले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: mns 50 workers resign after expulsion of 7 party office bearers in pune bypoll election 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.