मनसे कार्यकर्त्याचा आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Published: January 25, 2017 03:55 AM2017-01-25T03:55:11+5:302017-01-25T03:55:11+5:30

पालिका निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असताना मुलुंडमध्ये मनसे कार्यकर्ता महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या

MNS activist's suicide attempt | मनसे कार्यकर्त्याचा आत्महत्येचा प्रयत्न

मनसे कार्यकर्त्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Next

मुंबई : पालिका निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असताना मुलुंडमध्ये मनसे कार्यकर्ता महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली. नानाविध चर्चांना पेव फुटले. सुहासिनी कांबळे असे महिलेचे नाव असून, तिच्यावर मुलुंड अग्रवाल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ठाणे परिसरात कांबळे कुटुंबीयांसोबत राहतात. सोमवारी दुपारच्या सुमारास त्या मुलुंड पश्चिमेकडील डम्पिंग रोड येथे राहत असलेल्या नातेवाइकांकडे आल्या होत्या. तेथून निघताना त्यांनी रस्त्यावरच फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. स्थानिकांच्या मदतीने त्यांना तत्काळ मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्या मनसे कार्यकर्ता असल्याची माहिती समजताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. अनेकांनी उमेदवारीचे स्वप्न धूसर झाल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याच्या
चर्चा रंगल्या. अन्य पक्षांतही
हा चर्चेचा विषय ठरला. मुलुंडच्या मनसे पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यांची प्रकृती स्थिर असून मुलुंड पोलीस तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: MNS activist's suicide attempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.