MNS Akhil Chitre : "अवसरवादी ताई, तुम्हाला धड तुमचं नाव माहिती नाही, हिंमत असेल तर..."; मनसेचं खुलं आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 12:29 PM2022-05-19T12:29:48+5:302022-05-19T12:54:54+5:30
MNS Akhil Chitre Slams Shivsena Deepali Sayed : मनसे नेते अखिल चित्रे यांनी दीपाली सय्यद यांच्या टोल्याला प्रत्युत्तर देत टीकास्त्र सोडलं आहे.
शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंवर खोचक शब्दांत टीका केल्यानंतर आता मनसेनंदीपाली सय्यद यांना खुलं आव्हान दिलं आहे. "पावसाचे कारण देऊन मैदान सोडले. भोंग्याचे कारण देऊन देशपांडे पळाले. अयोध्याचे कंत्राट अर्धेच मिळाले. मुन्नाभाईच्या नावाने महाराष्ट्राला मामु मिळाले" असं ट्विट दीपाली यांनी केलं आहे. यानंतर आता मनसेने जोरदार हल्लाबोल केला आहे. "अवसरवादी ताई, तुम्हाला धड तुमचं नाव माहिती नाही. प्रत्येक वेळी राजकारणासाठी नाव बदलणाऱ्या तुम्ही" असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे.
मनसे नेते अखिल चित्रे (MNS Akhil Chitre) यांनी दीपाली सय्यद (MNS Akhil Chitre) यांच्या टोल्याला प्रत्युत्तर देत टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून काही स्क्रिनशॉट शेअर करत ट्विट केलं आहे. तसेच "आम्ही तुम्हाला इतके दिवस वाईड बॉल म्हणून उत्तर देत नव्हतो. इतके तर सरडाही रंग बदलत नाही, जितकी तुम्ही नावं बदलता" असं म्हटलं आहे. यासोबतच "तुमच्यात हिंमत असेल, तर आधी नाव बदलण्यामागचं रहस्य जनतेला आधी सांगा. नंतर हिंदुत्वाच्या, शिवसेनेच्या, बाळासाहेबांच्या विचारांच्या गप्पा मारा" असं ही अखिल चित्रे यांनी म्हटलं आहे.
दीपाली सय्यद,दीपाली भोसले सय्यद,दीपाली जहांगीर सय्यद,का सोफिया जहांगीर सय्यद?
— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) May 17, 2022
२०१४आप-अहमदनगर-दीपाली सय्यद
शिवसंग्राम व शिवसेना-दीपाली भोसले सय्यद
२०१९मुंब्राकळवा-सोफिया जहांगीर सय्यद
आप ते शिवसेना नावबदलत अवसरवादी प्रवास करणाऱ्या तुम्ही,सल्ले देणार?पहिले धड नाव ठरवा@deepalisayedpic.twitter.com/nUxIprPaY6
"अवसरवादी ताई, तुम्हाला धड तुमचं नाव माहिती नाही. प्रत्येक वेळी राजकारणासाठी नाव बदलणाऱ्या तुम्ही. २०१४ साली अहमदनगरमधून निवडणूक लढवली, तर नाव दीपाली सय्यद. २०१९ ला शिवसेनेकडून मुंब्रा-कळव्यातून निवडणूक लढवली, तर नाव सोफिया जहांगीर सय्यद. शिवसेनेत आणि शिवसंग्राममध्ये असताना प्रचारासाठी नाव दीपाली भोसले सय्यद. वारंवार राजकारणासाठी स्वत:चं नाव बदलणाऱ्या तुम्ही. तुम्हाला अवसरवादी नेत्या म्हणावं लागेल. तुम्ही इतरांना नावं ठेवता?" असं अखिल चित्रे यांनी जारी केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
"तुम्हाला काय उत्तर द्यायचं? म्हणून आम्ही तुम्हाला इतके दिवस वाईड बॉल म्हणून उत्तर देत नव्हतो. इतके तर सरडाही रंग बदलत नाही, जितकी तुम्ही नावं बदलता. आप ते शिवसंग्राम ते शिवसेना हा तुमचा विचार बदलत आणि नाव बदलत झालेला प्रवास आहे. तुमच्यात हिंमत असेल, तर आधी नाव बदलण्यामागचं रहस्य जनतेला आधी सांगा. नंतर हिंदुत्वाच्या, शिवसेनेच्या, बाळासाहेबांच्या विचारांच्या गप्पा मारा. आम्ही अपेक्षा करतो की तुम्ही उत्तर द्याल" अशा शब्दांत अखिल चित्रे य़ांनी दीपाली सय्यद यांना जाहीर आव्हान दिलं आहे.