Ameya Khopkar : "अफझलखाचे स्वयंघोषित प्रवक्ते आणि मुंब्रा प्रांताचे नवाब"; मनसेचा जितेंद्र आव्हाडांना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 10:35 AM2022-11-08T10:35:10+5:302022-11-08T10:51:58+5:30

MNS Ameya Khopkar Slams NCP Jitendra Awhad : मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ‘हर हर महादेव’वर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

MNS Ameya Khopkar Slams NCP Jitendra Awhad Over Har Har Mahadev Movie | Ameya Khopkar : "अफझलखाचे स्वयंघोषित प्रवक्ते आणि मुंब्रा प्रांताचे नवाब"; मनसेचा जितेंद्र आव्हाडांना खोचक टोला

Ameya Khopkar : "अफझलखाचे स्वयंघोषित प्रवक्ते आणि मुंब्रा प्रांताचे नवाब"; मनसेचा जितेंद्र आव्हाडांना खोचक टोला

googlenewsNext

 'हर हर महादेव' या मराठी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे काही चुकीच्या पद्धतीने दाखवलेले आहे, त्याला विरोध करत सोमवारी रात्री दहाच्या सुमारास राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP Jitendra Awhad) यांनी विवियाना मॉल येथील शो बंद पडला. यावेळी चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका प्रेक्षकाने चित्रपटाचे पैसे परत मागितले तसेच कोण जितेंद्र आव्हाड असा सवाल उपस्थित केल्यानंतर संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या प्रेक्षकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. यानंतर आता मनसे विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना ठाण्यात रंगला आहे. 

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (MNS Ameya Khopkar) यांनी ‘हर हर महादेव’वर आपली प्रतिक्रिया दिली आहे. सध्या सुरू असलेल्या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. "अफझलखाचे स्वयंघोषित प्रवक्ते आणि मुंब्रा प्रांताचे नवाब" असं म्हणत मनसेने जितेंद्र आव्हाडांना खोचक टोला लगावला आहे. अमेय खोपकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "अफझलखाचे स्वयंघोषित प्रवक्ते आणि मुंब्रा प्रांताचे नवाब यांचे इतिहासाचे ज्ञान... आणि हे महाराजांचा इतिहास खरा काय आणि खोटा काय ते सांगत आहेत..." असं म्हटलं आहे. 

"अफझल खान हा जर आपल्या सीमेचं रक्षण करण्यासाठी आला होता तर त्याने तुळजापूर येथील मंदिरावर हल्ला का केला??" असा सवालही त्यांनी आणखी एका ट्विटमध्ये विचारला  आहे. तसेच "शो बंद पडताय मग आमचे पैसे परत द्या अशी मागणी करणाऱ्या मराठी रसिकांना राष्ट्रवादीच्या गुंडांनी केलेली मारहाण" असं म्हणत या घटनेचा एक व्हिडीओ अमेय खोपकर यांनी शेअर केला आहे. 

काही दिवसांपूर्वी हर हर महादेव हा छत्रपती शिवाजी महाराजांवरील आधारित चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. मात्र या चित्रपटाला आता काहींना विरोध केला. ठाण्यात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विवियाना मॉल येथे जाऊन आंदोलन करत छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत चित्रपटाचा शो बंद पडला. यावेळी त्यांनी प्रेक्षकांना विनंती करून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र एका प्रेक्षकाने तिकिटाचे पैसे परत द्या आम्ही आमचा वेळ वाया घालवला आहे का, अशा शब्दात मॉल चालकाला सुनावले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याची समजूत देखील काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त झालेल्या या प्रेक्षकाने त्यांचं ऐकलं नाही. अखेर राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केल्याची घटना घडली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: MNS Ameya Khopkar Slams NCP Jitendra Awhad Over Har Har Mahadev Movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.