Ameya Khopkar : "पाकिस्तानी चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही म्हणजे नाही"; मनसेचा खळखट्याकचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 05:56 PM2022-12-28T17:56:48+5:302022-12-28T18:06:27+5:30

MNS Ameya Khopkar : महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी इशारा दिला आहे.

MNS Ameya Khopkar tweet Over Pakistani Movie The Legend of Maula Jatt | Ameya Khopkar : "पाकिस्तानी चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही म्हणजे नाही"; मनसेचा खळखट्याकचा इशारा

Ameya Khopkar : "पाकिस्तानी चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही म्हणजे नाही"; मनसेचा खळखट्याकचा इशारा

googlenewsNext

फवाद खान, माहिरा खान आणि हमजा अली अब्बासी यांसारख्या पाकिस्तानातील बड्या स्टार्सनी अभिनय केलेल्या 'द लीजेंड ऑफ मौला जट' हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाने पाकिस्तानी चलनानुसार १० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे २०० कोटींचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटाची क्रेझ पाकिस्तानातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये पाहायला मिळत आहे. अभिनेता फवाद खानचा ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’ हा चित्रपट येत्या ३० डिसेंबरला भारतात प्रदर्शित होणार आहे. 

पाकिस्तानी चित्रपटावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पावित्रा घेतला असून खळखट्याकचा इशारा दिला आहे. "पाकिस्तानी चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही म्हणजे नाही" असं म्हटलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (MNS Ameya Khopkar) यांनी इशारा दिला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. तसेच "तुम्ही मेहनतीने जी इमारत उभी केलीत, त्याची तोडफोड होईल असं कृत्य करू नका" असं म्हणत थिएटरमालकांना आवाहन केलं आहे.

अमेय खोपकर यांनी "पाकिस्तानी चित्रपट प्रदर्शनाला विरोध आहे म्हणजे आहे. यापूर्वी जो चित्रपट २३ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता, तो पाकिस्तानी चित्रपट आता ३० डिसेंबरला येतोय. हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही म्हणजे नाही" असं म्हटलं आहे. तसेच "थिएटरमालकांना नम्र आवाहन - मोठ्या मेहनतीने जी इमारत तुम्ही उभी केलीत, त्याची तोडफोड किंवा त्याचं नुकसान होईल असं कृत्य करु नका" असं देखील त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

चित्रपटाचे बजेट १०० कोटी 

द लिजेंड ऑफ मौला जट हा पाकिस्तानी चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात महागडा चित्रपट आहे. या चित्रपटाचे बजेट सुमारे १०० कोटी रुपये आहे. या चित्रपटाने बजेटनुसार चांगली कमाई केली आहे. चित्रपटाच्या अधिकृत इंस्टाग्रामनुसार, २१ नोव्हेंबरलाच चित्रपटाने २०० कोटी रुपयांचा (PKR) टप्पा ओलांडला होता. हा चित्रपट १३ ऑक्टोबर रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: MNS Ameya Khopkar tweet Over Pakistani Movie The Legend of Maula Jatt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.