Maharashtra Political Crisis: “मनसैनिकांनो! कामाला लागा, प्रत्येक निवडणूक लढायचीय आणि जिंकायचीय”: अमित ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 11:45 AM2022-08-06T11:45:07+5:302022-08-06T11:46:09+5:30

कुठलीही निवडणूक लागली तरी मला बोलवा. आपण जोरदार प्रचार करू, अशी ग्वाही अमित ठाकरे यांनी मनसैनिकांना दिली आहे.

mns amit thackeray said we will fight election and try to win | Maharashtra Political Crisis: “मनसैनिकांनो! कामाला लागा, प्रत्येक निवडणूक लढायचीय आणि जिंकायचीय”: अमित ठाकरे

Maharashtra Political Crisis: “मनसैनिकांनो! कामाला लागा, प्रत्येक निवडणूक लढायचीय आणि जिंकायचीय”: अमित ठाकरे

Next

Maharashtra Political Crisis: एकीकडे शिंदे गटाने केलेले बंड, शिवसेनेवर आलेले ऐतिहासिक संकट या पार्श्वभूमीवर दुसरीकडे मनसे पक्षसंघटना वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पाहायला मिळत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे विविध ठिकाणी दौरे काढत असून, पक्ष मजबूत करण्याच्यादृष्टीने पावले टाकत असल्याचे दिसत आहे. यातच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता कामाला लागण्याच्या सूचना अमित ठाकरे यांनी मनसैनिकांना केल्या आहेत. येत्या निवडणुकीत सक्षम उमेदवार द्यायचा आहे आणि तो निवडून आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करायचे आहेत, असे अमित ठाकरे म्हणाले. 

अमित ठाकरे मनसेमध्ये पुन्हा नव्याने उत्साह भरण्यासाठी कामाला लागले आहेत. सर्वसामान्य लोकांशी, तरुणांशी, विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. राज्यात आगामी कालावधीत अनेकविध निवडणुका होऊ घातल्या आहेत, त्याबाबत बोलताना, येणारी प्रत्येक निवडणूक आपल्यासाठी महत्त्वाची आहे. येत्या निवडणुकीत सक्षम उमेदवार द्यायचा आहे आणि तो निवडून आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करायचे आहेत. त्या निवडणुकांमध्ये प्रचार करण्यासाठी तयार आहे. कुठलीही निवडणूक लागली तरी मला बोलवा. आपण जोरदार प्रचार करू. आपल्याला प्रत्येक निवडणूक लढायची आहे आणि जिंकायचीदेखील आहे. त्यामुळे मनसैनिकांनो, कामाला लागा, अशा सूचना अमित ठाकरे यांनी दिल्या आहेत. 

काम आणि विचार घरोघरी पोहोचवू

आपल्या पक्षाने केलेले काम आणि विचार घरोघरी पोहोचवू, असे सांगत, आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेत बंड होण्याआधी मी माझे दौरे सुरू केलेत. पण माझा आदित्य ठाकरेंना प्रश्न आहे. जर एकनाथ शिंदे यांचे बंड झाले नसते तर तुम्ही दौरा केला असता का, एवढाच माझा एक प्रश्न आहे, असे अमित ठाकरे म्हणाले. तसेच तेजस ठाकरे ठाकरे राजकारणात सक्रीय होत आहेत, अशा चर्चा आहेत. त्यावर अमित ठाकरेंनी भाष्य केलेय. तेजस राजकारणात येत असतील तर त्यांचे स्वागत आहे, असे अमित ठाकरे यांनी सांगितले.
 

Web Title: mns amit thackeray said we will fight election and try to win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.