मनसेने जाहीर केली सहावी यादी; अशोक चव्हाणांच्या मुलीविरोधात 'हा' उमेदवार मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 09:15 PM2024-10-27T21:15:29+5:302024-10-27T21:16:25+5:30

MNS Candidate List : सहाव्या यादीसह मनसेने आतापर्यंत 110 उमेदवार जाहीर केले आहेत.

MNS announced sixth list; Candidate against Ashok Chavan's daughter | मनसेने जाहीर केली सहावी यादी; अशोक चव्हाणांच्या मुलीविरोधात 'हा' उमेदवार मैदानात

मनसेने जाहीर केली सहावी यादी; अशोक चव्हाणांच्या मुलीविरोधात 'हा' उमेदवार मैदानात

 

MNS Candidate List : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने(MNS) आपली उमेदवारांची सहावी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 32 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, रत्नागिरी, बीड, परभणी, नांदेड इ. जिल्ह्यातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. सहाव्या यादीसह मनसेने आतापर्यंत 110 उमेदवार जाहीर केले आहेत. 

मनसेने नाशिक पूर्वमधून प्रसाद सानप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच नाशिक मध्यमधून अंकुश पवार, जळगाव ग्रामीणमधून मुकुंदा रोटे, देवळाली मतदारसंघातून मोहिनी जाधव, विलेपार्लेतून जुईली शेंडे, कल्याण पश्चिममधून उल्हास भोईर, उल्हासनगरमधून भगवान भालेराव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

पाहा यादी:-

 

 

विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण यांच्या विरोधातदेखील उमेदवार दिला आहे. साईप्रसाद जटालवार यांना भोकरमधून श्रीजया यांच्याविरोधात उमेदवारी देण्यात आली आहे. 

Web Title: MNS announced sixth list; Candidate against Ashok Chavan's daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.