वर्धापनदिनी मनसेची शॅडो कॅबिनेट जाहीर; पाहा अमित ठाकरेंकडे किती आणि कोणती खाती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 01:21 PM2020-03-09T13:21:07+5:302020-03-09T13:47:21+5:30

मनसेच्या चौदाव्या वर्धापन दिनानिमित्तानं नवी मुंबईत मेळाव्याचं आयोजन

mns announces its shadow cabinet in navi mumbai on 14th foundation day kkg | वर्धापनदिनी मनसेची शॅडो कॅबिनेट जाहीर; पाहा अमित ठाकरेंकडे किती आणि कोणती खाती

वर्धापनदिनी मनसेची शॅडो कॅबिनेट जाहीर; पाहा अमित ठाकरेंकडे किती आणि कोणती खाती

googlenewsNext

नवी मुंबई: मनसेच्या चौदाव्या वर्धापन दिनानिमित्ताने वाशीत मेळाव्याला सुरुवात झाली आहे. पहिल्यांदाच मुंबईबाहेर पक्षाचा वर्धापन दिनाचा मेळावा होत असून त्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह मनसेचे इतरही नेते उपस्थित आहेत. त्यामध्ये पक्षाची शॅडो कॅबिनेट जाहीर झाली असून, त्यांच्यावर राज्य सकारच्या विविध खात्यांवर लक्ष ठेवण्याचे काम सोपवण्यात आले आहे.

नवी मुंबईत महापालिका निवडणुकीचे वारे वाहत असतानाच मनसेचा वर्धापन दिनाचा मेळावा सोमवारी वाशीत संपन्न झाला. या मेळाव्यात राज ठाकरे निवडणुकीच्या अनुषंगाने विरोधकांवर तोफ डागतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र निवडणुकीवर फारसं भाष्य न करता राज यांनी शॅडो कॅबिनेटवर भर दिला. मनसेची शॅडो कॅबिनेट सरकारच्या विविध खात्यांवर लक्ष ठेवून राहील, असं राज यांनी जाहीर केलं.

मनसेची शॅडो कॅबिनेट सरकारच्या प्रत्येक पावलावर, निर्णयावर लक्ष ठेवेल. सरकार चुकलं तर शॅडो कॅबिनेट वाभाडे काढू आणि सरकारनं चांगलं काम केल्यास त्यांचं कौतुकही करू, असं राज यांनी सांगितलं. प्रतिरूप मंत्रिमंडळाच्या बाबतीत पक्षाचे पदाधिकारी नसलात पण तुम्हाला एखाद्या विषयात काम करायची इच्छा असेल तर त्यांनी माझ्याशी थेट संपर्क साधावा. मी तुम्हाला ह्या कामात सहभागी करून घेईन, असंही राज ठाकरे म्हणाले.

गृह, विधी व न्याय, जलसंपदा, सामान्य प्रशासन- 
बाळा नांदगावकर
किशोर शिंदे
संजय नाईक
राजू उंबरकर
राहुल बापट
अवधूत चव्हाण
प्रवीण कदम
योगेश खैरे
माजी पोलीस अधिकारी बुद्धिवंत
प्रसाद सरफरे
डॉ. अनिल गजने
अ‍ॅड. रवींद्र पाष्टे
अ‍ॅड. जमीर देशपांडे
अ‍ॅड. दीपक शर्मा
अनिल शिदोरे - जलसंपदा

मराठी भाषा, माहिती व तंत्रज्ञान-
अनिल शिदोरे
अमित ठाकरे
अजिंक्य चोपडे
केतन जोशी

वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण आणि उद्योग-
नितीन सरदेसाई
हेमंत संभूस - (उद्योग)
वसंत फडके
मिलिंद प्रधान
पीयूष छेडा
प्रीतेश बोराडे
वल्लभ चितळे
पराग शिंत्रे
अनिल शिदोरे - वित्त व नियोजन 

महसूल आणि परिवहन- 
अविनाश अभ्यंकर
दिलीप कदम
कुणाल माईणकर
अजय महाले
संदीप पाचंगे
श्रीधर जगताप

ऊर्जा-
शिरीष सावंत
मंदार हळबे
सागर देव्हरे
विनय भोईटे

ग्रामविकास-
अ‍ॅड. जयप्रकाश बाविस्कर
अमित ठाकरे
परेश चौधरी
प्रकाश भोईर
अनिल शिदोरे

वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन-
संजय चित्रे
अमित ठाकरे
वागिश सारस्वत
संतोष धुरी
आदित्य दामले
ललीत यावलकर

शिक्षण-
अभिजीत पानसे
आदित्य शिरोडकर - उच्च शिक्षण
सुधाकर तांबोळी
चेतन पेडणेकर
बिपीन नाईक
अमोल रोग्ये

कामगार-
राजेंद्र वागस्कर
गजानन राणे
सुरेंद्र सुर्वे

नगरविकास आणि पर्यटन- 
संदीप देशपांडे
अमित ठाकरे
पृथ्वीराज येरुणकर
कीर्तिकुमार शिंदे
उत्तम सांडव
हेमंत कदम
योगेश चिले
संदीप कुलकर्णी 
फारुक डाला

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण- 
​​​​​​रिटा गुप्ता
कुंदा राणे

सहकार आणि पणन- 
दिलीप धोत्रे
कौस्तुभ लिमये 
वल्लभ चितळे
जयदेव कर्वे

अन्न व नागरी पुरवठा- 
राजा चौगुले
महेश जाधव
वैभव माळवे
विशाल पिंगळे

मत्स्यविकास आणि बंदरे- 
परशुराम उपरकर
जितू चव्हाण
निशांत गायकवाड

महिला व बालविकास- 
शालिनी ठाकरे
सुनिता चुरी

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळता)- 
योगेश परुळेकर
अभिषेक सप्रे
सीमा शिवलकर

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)- 
संजय शिरोळकर

रोजगार हमी आणि फलोत्पादन- 
बाळा शेडगे
आशिष कोरी

सांस्कृतिक कार्य आणि राजशिष्टाचार- 
अमेय खोपकर

कृषी व दुग्धविकास- 
संतोष नागरगोजे
संजू पाखरे
अमर कदम

कौशल्य विकास व उद्योजकता- 
स्नेहल जाधव

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य- 
गजानन काळे
अ‍ॅड. संतोष सावंत
अनिल करपे

ग्राहक संरक्षण-
प्रमोद पाटील

राज्य उत्पादन शुल्क- 
वसंत फडके

आदिवासी विकास-
आनंद एंबडवार
किशोर जाचक
परेश चौधरी

पर्यावरण- 
रुपाली पाटील
कीर्तिकुमार शिंदे
जय शृंगारपुरे
देवव्रत पाटील

खार जमिनी पुनर्विकास आणि भूकंप पुनर्वसन- 
अनिता माजगावकर

पाणीपुरवठा आणि सार्वजनिक स्वच्छता- 
अरविंद गावडे

क्रीडा व युवक कल्याण- 
विठ्ठल लोकणकर 
अरुण जांभळे

अल्पसंख्याक विकास आणि वक्फ- 
इरफान शेख
सईफ शेख
जालीम तडवी
जावेद शेख
अल्ताफ खान

Web Title: mns announces its shadow cabinet in navi mumbai on 14th foundation day kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.