MNS:'हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सत्तेत आले आणि आता...', मनसे नेत्यांचा सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 09:29 PM2022-04-07T21:29:41+5:302022-04-07T21:36:36+5:30

'एकाने राजीनामा दिला म्हणून तांडव करू नका, अनेक मुस्लिम पदाधिकारी अजूनही पक्षात आहेत'- अविनाश जाधव

MNS: 'came to power on Hindutva and then leave it', MNS leader slams maharashtra govt | MNS:'हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सत्तेत आले आणि आता...', मनसे नेत्यांचा सरकारवर हल्लाबोल

MNS:'हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सत्तेत आले आणि आता...', मनसे नेत्यांचा सरकारवर हल्लाबोल

googlenewsNext

ठाणे: 9 एप्रिल रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची होणारी सभा आता 12 एप्रिल रोजी होणार आहे. याशिवाय, सभेचे ठिकाणही बदलण्यात आले आहे. मनसे नेत्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरेंच्या सभेविषयी माहिती दिली. तसेच, यावेळी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन विरोधकांवर टीकाही केली. यावेळी मनसेचे नेते अभिजीत पानसे, सदीप देशपांडे, आमदार राजू पाटील आणि अविनाश जाधव उपस्थित होते.

'सेनेने हिंदुत्व सोडले'
यावेळी बोलताना अभिजीत पानसे म्हणाले की, आम्ही 9 तारखेला सभा घेणार होतो, पण नवरात्र सुरू असल्यामुळे अनेकांना त्रास होईल, हे लक्षात घेऊन सभा 12 तारखेला घेण्याचे ठरवले आहे. गडकरी रंगायतन समोरील रस्त्यावर ही सभा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, राजकीय सभेला परवानगी द्यायला 10 तास लागत असतील पोलिसांवर कोणाचा दबाव आहे? असा सवाल त्यांनी यावेळी केला. याशिवाय, हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन सत्तेवर आले आणि आता हाच मुद्दा सोडून दिला, असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला.

...तर ठाण्यात येऊन धमक्या द्या
यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आमच्या सभेला परवानगी देऊ नये म्हणून यांचे मंत्री फोन करतात. ही नाटकं समजणार नाही इतके आम्ही दुधखुळे नाही. यांना आता लोकशाही आठवत नाही का? असा सवाल देशपांडे यांनी केला. याशिवाय, मुंब्रामधील कार्यालयाच्या जागी कोणी येऊ शकले नाही, तो मुद्दा आमच्या साठी संपला. हिम्मत आहे तर ठाण्यात येऊन अशा धमक्या द्या, असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी यावेळी दिला.

निष्ठावान कार्यकर्ते पक्षात आहेत
यावेळी अविनाश जाधव यांनी पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यावरही भाष्य केले. एका शाखाध्यक्षने राजीनामा दिला म्हणून इतका तांडव करू नये, असे खूप मुस्लिम कार्यकर्ते पदाधिकारी आहेत जे अजूनही पक्षात आहेत. वसंत मोरे अजूनही पक्षात आहेत, ते निष्ठावन आहेत. 12 तारखाला तेदेखील सभेला येतील, त्यामुले ज्या बातम्या सुरू आहेत त्या खोट्या आहेत, असे जाधव म्हणाले.
 

Web Title: MNS: 'came to power on Hindutva and then leave it', MNS leader slams maharashtra govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.