मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिला ममता बॅनर्जींच्या आंदोलनाला पाठिंबा 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 01:18 AM2019-02-04T01:18:16+5:302019-02-04T10:29:25+5:30

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सीबीआय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात पुकारलेल्या आंदोलनाला देशभरातील विरोधी पक्षनेत्यांकडून पाठिंबा मिळत आहे.

MNS chief Raj Thackeray gave support to Mamata Banerjee's dharana movement | मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिला ममता बॅनर्जींच्या आंदोलनाला पाठिंबा 

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिला ममता बॅनर्जींच्या आंदोलनाला पाठिंबा 

मुंबई - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सीबीआय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला देशभरातील विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून पाठिंबा मिळत आहेत. दरम्यान, मनसेप्रमुखराज ठाकरे यांनीसुद्धा ममता बॅनर्जी यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. 

ममता बॅनर्जी यांनी आंदोलनाला सुरुवात केल्यानंतर मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. ''केंद्राच्या एकाधिकारशाही विरोधात मा. ममता बॅनर्जी ह्यांनी जो आवाज उठवला आहे त्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या ह्या लढ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा मी जाहीर करतो,'' असे राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

''राज्य सरकारला विश्वासात न घेता, सीबीआयने कोलकात्याच्या पोलीस आयुक्तांच्या घरावर छापेमारी केली. सीबीआयची स्वायत्तता संपुष्टात यावी ह्यासाठी अलोक वर्मा प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे जे प्रकार केले ते देशाने पहिले. पण  नरेंद्र मोदींनी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी सीबीआय सारख्या स्वायत्त संस्थेचा बळी घेण्याचा प्रयत्न करू नये. आपला देश संघराज्य आहे आणि राज्यांच्या अधिकारांवर घाला घालण्याचा कोणताही अधिकार केंद्र सरकारला नाही हे भाजप सरकारने विसरू नये.''असा सल्ला राज ठाकरे यांनी दिला आहे.



 





दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या आंदोलनाला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, डीएमके प्रमुख स्टॅलिन, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू,  जनता दल सेक्युलरचे एच.डी. देवेगौडा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनीसुद्धा ममता बॅनर्जी यांच्या धऱणे आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. 



 



 

Web Title: MNS chief Raj Thackeray gave support to Mamata Banerjee's dharana movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.