राज ठाकरे मराठवाडा दौरा अर्धवट सोडणार; उद्या मुंबईत परतणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 02:09 PM2020-02-14T14:09:04+5:302020-02-14T14:23:06+5:30
राज ठाकरे मराठवाडा दौरा गुंडाळणार; कारण अस्पष्ट
औरंगाबाद: मनसे प्रमुख राज ठाकरे त्यांचा मराठवाडा दौरा अर्धवट सोडणार आहेत. राज ठाकरेंचामराठवाडा दौरा तीन दिवसांचा होता. मात्र ते उद्या सकाळीच मुंबईत परतणार आहेत. राज यांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मात्र यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
राज ठाकरे काल संध्याकाळी औरंगाबादला पोहोचले. ते १६ फेब्रुवारीला मुंबईला परतणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार त्यांचे कार्यक्रम ठरलेले होते. मात्र आता राज यांनी मराठवाडा दौरा गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. राज ठाकरे उद्या सकाळी मुंबईत परतणार आहेत. त्यामुळे त्यांचे उद्याचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. राज ठाकरे उद्या पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेणार होते. ते शिक्षकांच्या संमेलनादेखील उपस्थित राहणार होते. याशिवाय काही हिंदुत्ववादी संघटना आणि प्रतिष्ठीत व्यक्तींनादेखील भेटणार होते.
Raj Thackeray: 'लाव रे तो व्हिडीओ'मधून पुलवामा हल्ल्यावर शंका घेणारे राज ठाकरे आता म्हणतात...
औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे औरंगाबादमध्ये आले आहेत. आज सकाळी त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठकदेखील घेतली. निवडणुकीची रणनीती निश्चित करण्याच्या दृष्टीनं ही बैठक महत्त्वाची होती. मात्र राज यांनी ही बैठक अवघ्या तासाभरातच गुंडाळली. राज यांनी महापालिका निवडणुकीसाठी ५ सदस्यीय समितीची स्थापना केली. निवडणूक प्रचार, त्यातले मुद्दे, पक्षप्रवेश, आश्वासनं याबद्दलचे निर्णय घेण्याची जबाबदारी या समितीवर असेल.
Raj Thackeray: 'हिंदूजननायक' उपाधीवर राज ठाकरेंनी हातच जोडले, जरा चिडूनच म्हणाले...
तत्पूर्वी राज यांनी सकाळी पत्रकारांनी अनौपचारिक गप्पा मारल्या. त्यावेळी त्यांना पुलवामा हल्ल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर काय बोलणार त्याच्यावर आता? जे शहीद झाले त्यांचं दुर्दैव. तो हल्ला घडवून आणला आहे, अशी त्यावेळची चर्चा होती. तसे काही पुरावे समोर आले होते. जवानांना त्या मार्गानं घेऊन जाऊ नका, अशा सूचना असतानाही तरीही त्याच रस्त्यानं नेण्यात आलं होतं. त्याबद्दल मी प्रश्न विचारले होते,' असं राज ठाकरे म्हणाले. 'मला वाटतं जे घडायचं होतं, ते घडलं. जायचे ते लोक गेले. नवीन सरकार बसलं. सगळ्या गोष्टी घडल्या,' अशा शब्दांत राज यांनी पुलवामातील हल्ल्यावर भाष्य केलं.
दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या-
पुलवामा हल्ल्याचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला?; राहुल गांधींचा सवाल
Pulwama Attack : गर्व इतना था कि हम देर तक रोये नही... Pulwama च्या शहिदांना दिलेलं 'ते' वचन जवानांनी पूर्ण केलं!
आघाडीत बिघाडी? शरद पवार म्हणतात, मुख्यमंत्र्यांच्या 'तो' निर्णय अतिशय अयोग्य