मीरारोड व भार्इंदर रेल्वे स्थानकातील अतिक्रमण हटवण्याची मनसेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2017 10:23 PM2017-09-30T22:23:10+5:302017-09-30T22:25:51+5:30

एलफिस्टन पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटने नंतर मीरारोड व भार्इंदर रेल्वे स्थानक व परिसरातील प्रवाशांच्या येण्या जाण्याच्या मार्गावर बसलेले फेरीवाले, बेकायदा पार्किंग व अतिक्रमण हटवण्याची मागणी मनसेने रेल्वे सुरक्षा बलासह स्टेशन मास्तरांकडे केली आहे.

MNS demands to remove encroachment in Mirror and Bhinder railway station | मीरारोड व भार्इंदर रेल्वे स्थानकातील अतिक्रमण हटवण्याची मनसेची मागणी

मीरारोड व भार्इंदर रेल्वे स्थानकातील अतिक्रमण हटवण्याची मनसेची मागणी

Next

मीरारोड - एलफिस्टन पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर मीरारोड व भार्इंदर रेल्वे स्थानक व परिसरातील प्रवाशांच्या येण्याजाण्याच्या मार्गावर बसलेले फेरीवाले, बेकायदा पार्किंग व अतिक्रमण हटवण्याची मागणी मनसेने रेल्वे सुरक्षा बलासह स्टेशन मास्तरांकडे केली आहे.

मीरारोड व भार्इंदर ही शहरात दोन रेल्वे स्थानकं आहे. झपाट्याने शहर वाढल्याने या दोन्ही रेल्वे स्थानकांमधून प्रचास करणार-या प्रवाशांची संख्यादेखील काही लाखांच्या घरात आहे. भार्इंदर रेल्वे स्थानकात पश्चिम व पूर्वेला बाहेर पडणा-या जीन्यांजवळ बेकायदा रिक्षा, दुचाकी उभ्या असतात. तर काही प्रमाणात फेरीवालेदेखील अतिक्रमण करुन आहेत. यामुळे जीन्यावरुन बाहेर पडताना प्रवाशांना अडथळा होतो. दक्षिणेकडच्या अरुंद पुलावर तर फेरीवाले, भिकारी बस्तान मांडून असतात.

मीरारोड स्थानक व पादाचारी पुलासह लागून असेला स्कायवॉक हा तर सर्रास फेरीवाल्यांनीच बळकावून टाकला आहे. या स्थानकाबाहेर देखील हातगाडी वाल्यांचा विळखा पडलेला आहे. स्काय वॉकखाली पालिकेने बेकायदेशीर रीत्या काही व्यावसायीकांना पक्के गाळे बांधुन दिले आहेत. मीरारोडच्या प्रवाशांना तर स्थानकात जाण्यासाठी व बाहेर येण्यासाठी अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागते. त्यातच बेकायदा पर्किंगची भर पडते.

रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे प्रशासन, पोलीस व महापालिका हे फेरीवाले, भिकारी, गर्दुल्ले यांच्यावर कारवाई करण्यावरुन एकमेकांकडे बोटं दाखवून जबाबदारी झटकण्याचा प्रकार करतात. स्थानकाचे जीने वा मार्गा बाहेर होणारी बेकायदा पार्किंग, रिक्षांना हटवण्याकडे देखील दुर्लक्ष केले जाते. मीरारोड स्थानकालगत झालेले व्यावसायिक गाळ्यांवर कारवाई केली नात नाही आदी मुद्दे मनसेच्या शिष्टमंडळाने स्टेशन मास्तर व रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी यांना निदर्शनास आणून दिले आहेत. त्यांना निवेदनसुद्धा दिले आहे. मनसे शहरअध्यक्ष प्रसाद सुर्वेसह शशी मेंडन आदी उपस्थित होते.

रेल्वे, महापालिका, पोलीस आदी सर्व सबंधित यंत्रणांनी तातडीने कार्यवाही सुरू करुन रेल्वे प्रवाशांना ये-जा करण्यासाठी असलेले सर्व जीने, मार्ग व प्रवेशद्वार मोकळे करावे, अशी मागणी प्रसाद सुर्वे यांनी केली आहे.

Web Title: MNS demands to remove encroachment in Mirror and Bhinder railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.