मुख्यमंत्र्यांसमोर मनसेची पुण्यात निदर्शने

By admin | Published: May 13, 2016 02:20 PM2016-05-13T14:20:40+5:302016-05-13T16:31:30+5:30

मुख्यमंत्र्यांनी वेगळ्या विदर्भासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांसमोर निदर्शने केली

MNS faces protest in front of CM | मुख्यमंत्र्यांसमोर मनसेची पुण्यात निदर्शने

मुख्यमंत्र्यांसमोर मनसेची पुण्यात निदर्शने

Next
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १३ -  मुख्यमंत्र्यांनी वेगळ्या विदर्भासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांसमोर निदर्शन केली. पुण्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी पुण्यात आले आहेत.
विधानभवन येथे बैठकीसाठी येत असताना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर निदर्शने केली. वेगळ्या विदर्भाच्या प्रश्नावर घेतलेल्या मतदानात सहभागी झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी. तसेच राज्यातील ३३ हजार विहिरी गायब कशा झाल्या याबाबत स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी करण्यात आली. पोलीसांनी कार्यकर्त्यांना प्रवेशद्वारावरच रोखले. विधानभवन परिसरात ठेवलेल्या प्रचंड बंदोबस्तामुळे छावणीचे स्वरुप आले होते.  पुण्याच्या विविध प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पुणे मेट्रोला जून अखरेपर्यंत मंजुरी देऊ असे आश्वासन दिले. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेवर आपण समाधानी आहेत असे पुण्याच्या महापौरांनी सांगितले. 

Web Title: MNS faces protest in front of CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.