Gajanan Kale : "कोणी मैदान देता का मैदान, शिल्लक सेनाप्रमुखांना आता फेसबुकवर..."; मनसेचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 01:44 PM2022-09-22T13:44:42+5:302022-09-22T14:03:47+5:30

MNS Gajanan Kale Slams Shivsena Uddhav Thackeray : "मुंबई शहर अजून भकास करायला व लक्तर तोडायला यांना सत्ता हवी, शिल्लक सेनेपासून मुंबई वाचवा" अशा शब्दांत शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

MNS Gajanan Kale Slams Shivsena Uddhav Thackeray Over dasara melava politics | Gajanan Kale : "कोणी मैदान देता का मैदान, शिल्लक सेनाप्रमुखांना आता फेसबुकवर..."; मनसेचा खोचक टोला

Gajanan Kale : "कोणी मैदान देता का मैदान, शिल्लक सेनाप्रमुखांना आता फेसबुकवर..."; मनसेचा खोचक टोला

Next

मुंबई - शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा आयोजित केल्यास उद्धव ठाकरे गट व एकनाथ शिंदे गटांपैकी कोणत्याही एका गटास परवानगी दिली तर शिवाजी पार्क सारख्या संवेदनशील परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा अभिप्राय शिवाजी पार्क पोलीस ठाण्याने दिल्याने मुंबई महापालिकेने दोन्ही गटांचा अर्ज बुधवारी फेटाळल्याची माहिती गुरुवारी उच्च न्यायालयाला देण्यात आली. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाने पालिकेच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी याचिकेत सुधारणा करण्याची परवानगी न्यायालयाकडून मागितली. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी आता शुक्रवारी ठेवली आहे. यानंतर याता यावरून मनसेने शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे. 

"कोणी मैदान देता का मैदान ...!" असं म्हणत मनसेने निशाणा साधला आहे. तसेच "मुंबई शहर अजून भकास करायला व लक्तर तोडायला यांना सत्ता हवी, शिल्लक सेनेपासून मुंबई वाचवा" अशा शब्दांत शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. मनसेचे नेते गजानन काळे (MNS Gajanan Kale) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "कोणी मैदान देता का मैदान ...! शिल्लक सेनेला शिवतीर्थावर "टोमणे मेळावा" घेण्यासाठी मैदान नाकारले... शिल्लक सेनाप्रमुख यांना आता फक्त फेसबुकवरच मेळावा घेण्याचा पर्याय उपलब्ध..." असं म्हणत बोचरी टीका केली आहे. 

"शिल्लक सेनेने रस्ते, मलनिःसारण, आरोग्य यंत्रणा, गार्डन, खेळाची मैदान, पाणी, ट्रॅफिक प्रश्न या सगळ्या पातळीवर या मुंबई शहराचा नुसता विचका केलाय काही दशकं महापालिकेच्या सत्तेत असताना ... टक्केवारी आणि कमिशनच राजकारण करून असे असंख्य यशवंत, कीर्तिवंत भ्रष्टाचाराचे राक्षस उभे केले यांनी आणि आता हेच राक्षस यांना गिळू लागले आहेत." 

"मुंबई शहर अजून भकास करायला व लक्तर तोडायला यांना सत्ता हवी आहे. मराठी माणसाने आता भावनेने नव्हे, डोक्याने विचार करून हे शहर आपल समजून वरील प्रश्नांवर मनापासून काम करणाऱ्यांच आता निवडून द्यायची गरज आहे. शिल्लक सेनेपासून मुंबई वाचवा" असंही गजानन काळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 
 

Web Title: MNS Gajanan Kale Slams Shivsena Uddhav Thackeray Over dasara melava politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.