२०,००० सरकारी नोकऱ्या, मराठी तरुणांसाठी मेगाभरती; अमित ठाकरेंनी घेतला पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 01:22 PM2022-10-06T13:22:24+5:302022-10-06T13:30:57+5:30
मनसेने विजयादशमी दिवशी मराठी तरुणांच्या नोकरीसाठी मार्गदर्शन पुस्तिकेचे प्रकाशन केले आहे. स्टाफ सिलेक्शनमध्ये २० हजार जागांसाठी महाभरती निघणार आहे.
मुंबई: मनसेने विजयादशमी दिवशी मराठी तरुणांच्या नोकरीसाठी मार्गदर्शन पुस्तिकेचे प्रकाशन केले आहे. स्टाफ सिलेक्शनमध्ये २० हजार जागांसाठी महाभरती निघणार आहे. याबाबत मराठीमध्ये माहिती देणारी पुस्तिका मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी बनवले आहे. या पुस्तकाचे काल मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन झाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी "मराठी तरुणाईसाठी नोकरीची महासंधी- स्टाफ सिलेक्शन कमिशनची महाभरती" ही मार्गदर्शन पुस्तिका बनवली आहे. ही पुस्तिका सीजीएलई २०२२( CGLE 2022) स्पर्धापरीक्षा देऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक मराठी तरुणांना अत्यंत उपयुक्त ठरेल, असं मत अमित ठाकरे यांनी व्यक्त केले.
राहुल गांधींचं मातृप्रेम, भारत जोडो यात्रेमध्ये आईसाठी बनले श्रावण बाळ; फोटो व्हायरल
डिजिटल रुपात प्रसिद्ध होणारी ही पुस्तिका लक्षावधी मराठी तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी या स्पर्धा परीक्षेचा फॉर्म भरावा, यासाठी मनसे तसेच मनविसेचे पदाधिकारी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत, असंही अमित ठाकरे म्हणाले.
येत्या काही दिवसांत या स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी ठिकठिकाणी मनविसेच्या माध्यमातून मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याचे ठाकरे म्हणाले.