राज ठाकरे आणि तुमच्यात साम्य काय?; अमित ठाकरेंच्या मिश्किल उत्तराने हशा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 07:47 AM2022-09-29T07:47:38+5:302022-09-29T11:57:04+5:30
lokmat most stylish awards 2022: हा माझ्या आयुष्यातील पहिला पुरस्कार आहे असं सांगत अमित ठाकरे यांनी लोकमतचे आभार मानले.
मुंबई - लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड २०२२ चा रंगतदार सोहळा मुंबईत मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. या सोहळ्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांना लोकमतकडून यंदाचा लोकमत मोस्ट स्टायलिश पॉलिटिशन पुरस्कारानं गौरवण्यात आले. लोकमत समुहाचे मुख्य संपादक राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. (lokmat most stylish awards 2022)
हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर अमित ठाकरे यांनी लोकमतचे धन्यवाद मानले. अमित ठाकरे म्हणाले की, हा माझ्या आयुष्यातील पहिला पुरस्कार आहे. मी मराठीत बोलतो. मला ४ दिवसापूर्वी हा पुरस्कार मला देत असल्याचं कळवण्यात आले. तेव्हा माझ्या मनात पहिला हा विचार आला की, नॉमिनीज कोण आहेत? असे कोण स्टायलिश पॉलिटिशन्स आहेत ज्यांच्यातून मला निवडून हा पुरस्कार देण्यात आला. पण इथे आल्यावर कळालं नॉमिनीज नाहीत. या पुरस्काराबद्दल मी लोकमतचे आभारी आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच मी नुकताच राजकारणात आलो आहे. २ वर्षापासून काम करतोय. मला अजून खूप शिकायचं, फिरायचं आहे. महाराष्ट्र समजून घ्यायचा आहे. लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा, मुंबई लोकमत संपादक अतुल कुलकर्णी यांच्या प्रेमापोटी मी पुरस्कार स्वीकारला. मी लोकमतचे आभार मानतो असंही अमित ठाकरे यांनी म्हटलं. तुमच्यात अन् वडील राज ठाकरेंमध्ये काय फरक आहे असा प्रश्न विचारताच अमित ठाकरेंनी My Style is Better असं दिलखुलास उत्तर देत उपस्थितांची दाद मिळवली.
मनसे नेते आणि विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांना लोकमत मोस्ट स्टायलिश पॉलिटिशन २०२२ या पुरस्कारनं गौरवण्यात आले @mnsadhikrut#AmitThackeraypic.twitter.com/0VfTVub50g
— Lokmat (@lokmat) September 29, 2022