विद्यापीठाचा कारभार खाजगी कंपन्यांच्या हाती; प्रशासनाने खुलासा करण्याची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 09:43 PM2021-02-02T21:43:55+5:302021-02-02T21:45:46+5:30

आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी विद्यार्थ्यांच्या शुल्कातून या खाजगी कंपन्यावर कोट्यवधींची उधळपट्टी होत असल्याचा दावा मनसेचे नेते आणि सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनी केला आहे.

mns leader and cinet member sudhakar tamboli claims that mumbai university is run by private companies | विद्यापीठाचा कारभार खाजगी कंपन्यांच्या हाती; प्रशासनाने खुलासा करण्याची मागणी 

विद्यापीठाचा कारभार खाजगी कंपन्यांच्या हाती; प्रशासनाने खुलासा करण्याची मागणी 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई :मुंबई विद्यापीठ हे सध्या खाजगी कंपन्यांना देण्यात येणारी कामे, त्यांच्यामुळे येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि विद्यार्थी व प्रशासनाला होणारा नाहक त्रास यांनी गेल्या काही वर्षांपासून वेधले गेले असल्याचा आरोप विद्यार्थी संघटना आणि सिनेट सदस्य करत आहेत. मुळात बाह्यसंस्थांमार्फत कामे करून घेण्यात विद्यापीठाचे आणि त्या अनुषंगाने  विद्यार्थ्यांचे कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी विद्यार्थ्यांच्या शुल्कातून या खाजगी कंपन्यावर कोट्यवधींची उधळपट्टी होत असल्याचा दावा मनसेचे नेते आणि सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनी केला आहे. या प्रकारासंबंधात कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांची भेट घेऊन निवेदन देऊन याच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे आणि विद्यापीठाकडून खाजगी कंपन्यांच्या माहिती देण्यासंदर्भात खुलासा मागितला आहे. 

विद्यापीठ व एमकेसीएल कंपनीचा करार मागील अनेक वर्षांपासून असला तरी त्यासंबंधीची माहिती विद्यापीठाकडे उपलब्ध नाही, त्यांच्यावर कामात कसूर झाल्यासही कारवाई होत नाही, प्रत्येक विभागाची एमकेसीएल संदर्भात तक्रार असूनही विद्यापोईथ प्रशासन एमकेसीएलवर मेहेरबान का, असा सवाल तांबोळी यांनी उपस्थित केला आहे. मेरिट ट्रॅक कंपनीसोबतही विद्यापीठाचा करार असून उत्तरपत्रिका तपासणीच्या कामातील त्यांना ही सूट दिली जात आहे. परीक्षा ऑनलाईन होऊनही विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका स्कॅन करून मिळण्याची सुविधा मिळत नाही. विद्यार्थ्यांना सुविधा मिळत नाहीत तर विद्यापीठाचे उत्तरपत्रिका तपासणीचे करोडो रुपये जातात कुठे, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत. 

'लोकमंगल'चे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर; जाणून घ्या यंदाचे कोण आहेत मानकरी...!

याचसोबत विद्यापीठ व्हीसी फेलोशिपसारख्या अनावश्यक योजनेवर ख्रह का आणि कोणाच्या परवानगीने करत आहे याचा खुलासा विद्यापीठाने करावा अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळणे कुलगुरू पेडणेकर यांच्याशी झालेल्या बैठकीत केली आहे. सुरक्षा रक्षकांची ही विद्यापीठाकडून खाजगी यंत्रणेची नेमणूक करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या सुरक्षारक्षक आणि खाजगी सुरक्षारक्षक यांच्या वेतनात भेदभाव विद्यापीठ प्रशासनकडून होतो असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे विद्यापीठ सुरक्षारक्षकानाचे वेतन वाढवून खाजगी सुरक्षा रक्षकांची आवश्यकता काढल्यास प्रशासनाच्या तिजोरीवरचा ही भर कमी होईल त्यामुळे ही मागणीही विचारात घ्यावी असे त्यांनी कुलगुरूंशी झालेल्या चर्चेत म्हणणे मांडले आहे. विद्यापीठाने खाजगी व कंत्राटी पद्धतीने काम करण्यापेक्षा स्वतःची यंत्रणा उभारल्यास प्रशासन बळकट होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मनसेच्या प्रश्नावर पुढील १५ दिवसांत विद्यापीठ प्रशासनाने लेखी खुलासा कळवावा तसेच आपण यासंबंधी काय कार्यवाही करत आहात याची माहिती द्यावी अशी मागणी तांबोळी यांनी कुलगुरू डॉ सुहास पेडणेकर यांच्याकडे केली आहे.  यावर कुलगुरूंनी खाजगी कंपन्यांऐवजी  विद्यापीठ स्वतंत्र यंत्रणा तयार करेल, असे आश्वासन दिले असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

Web Title: mns leader and cinet member sudhakar tamboli claims that mumbai university is run by private companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.