".. तर एवढी तौबा तौबा करायची काय गरज?, विचारांसोबत धर्मही बदललात काय?"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 03:31 PM2022-04-13T15:31:04+5:302022-04-13T15:32:16+5:30
मनसेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट सवाल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांच्या विरोधात आता ठाण्यातील (Thane) पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यात झालेल्या सभेदरम्यान राज ठाकरे यांनी तलवार दाखवली होती. यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर मनसेचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी मुख्यमंत्र्यांना थेट सवाल केलाय.
"शिवरायांचे प्रतिक म्हणून दिलेली तलवार म्यानातून बाहेर काढून दाखवली तर एवढी तौबा तौबा करायची काय गरज आहे? विचारांबरोबर धर्म पण बदललात काय? आणि एवढाच कायदा राबवायचा असेल तर तो मराठी पाट्या व भोंग्याबद्दल राबवा की जनाब ….!," असं म्हणत राजू पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
शिवरायांचे प्रतिक म्हणून दिलेली तलवार म्यानातून बाहेर काढून दाखवली तर एवढी तौबा तौबा करायची काय गरज आहे ? विचारांबरोबर धर्म पण बदललात काय ? आणि एवढाच कायदा राबवायचा असेल तर तो मराठी पाट्या व भोंग्याबद्दल राबवा की जनाब ….! #UT@OfficeofUT
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) April 13, 2022
काल पार पडली 'उत्तर सभा'
ठाण्यात मंगळवारी मनसेची 'उत्तर' सभा पार पडली. यावेळी ठाणे जिल्ह्याच्यावतीनं राज ठाकरे यांचा व्यासपीठावर सत्कार करण्यात आला. यात त्यांना एक तलवार भेट देण्यात आली. राज ठाकरेंनी तलवार दाखवून तिचा स्वीकार केला होता. सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगणे, दाखवणे, उगारणे यासंदर्भात कायद्यात तरतुदी आहेत.
#UPDATE Case registered against MNS chief Raj Thackeray under Arms Act at Naupada Police Station in Thane. Avinash Jadhav and Ravindra More also booked— ANI (@ANI) April 13, 2022
यानुसार राज ठाकरे,मनसे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांच्यासह ७ ते ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अशाप्रकारचे गुन्हा याआधी महाविकास आघाडीतील मंत्री वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख यांच्याविरोधातही दाखल झाले आहेत.