लेख: धार्मिक तेढ कोण निर्माण करतंय?, महाराष्ट्राचं 'राज'कारण नीट समजून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 02:00 PM2022-04-29T14:00:45+5:302022-04-29T15:31:28+5:30

राजसाहेबांबद्दल एक गोष्ट नक्की आहे " you can love him you can hate him but you can not ignore him"

mns leader sandeep deshpande article about religious rift and politics of maharashtra | लेख: धार्मिक तेढ कोण निर्माण करतंय?, महाराष्ट्राचं 'राज'कारण नीट समजून घ्या!

लेख: धार्मिक तेढ कोण निर्माण करतंय?, महाराष्ट्राचं 'राज'कारण नीट समजून घ्या!

- संदीप देशपांडे

२ एप्रिल २०२२ ची राजसाहेबांची गुढी पाडव्याची सभा ही महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारी ठरली. शिवतीर्थावरच्या या सभेनंतर अनेक ऊलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. मनसे हा संपलेला पक्ष आहे, आम्ही सुपारी घेतलेली आहे, मनसे नेहमी भूमिका बदलते, राजसाहेब हे सभा घेतात आणि मग गायब होतात अश्या अनेक गोष्टी बोलल्या गेल्या. पण राजसाहेबांबद्दल एक गोष्ट नक्की आहे " you can love him you can hate him but you can not ignore him" त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही म्हणण्याऱ्या जाणता राजांना पत्रकार परिषद आणि प्रत्येक भाषणात उत्तर द्यावं लागलं. शिवसेनेची  तर अवस्था अशी झाली होती ती की, "रामचंद्र कहे गये सिया से ऐसा कलयुग आयेगा शिव की सेना कहेलेने वाला हनुमान चालीसा से डर जयेगा" 

12 एप्रिलला ठाण्यात राजसाहेबांची उत्तरसभा झाली त्या सभेत महाविकास आघाडीचे वाभाडे काढले आणि त्या नंतर महाराष्ट्राचं राजकारण हे हनुमान चालीसा आणि भोंगे या दोन शब्दांच्या भोवतीच फिरत आहे. असो. मला या सगळ्यात एक प्रश्न पडतो तो असा की, आमच्यावर आरोप होतो की राजसाहेब हे धार्मिक तेढ पसरवण्याचं काम करतायत. मुळात प्रश्न असा आहे की आम्ही म्हणतोय 2005च्या सर्वोच न्यायालयाच्या आणि विविध उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं पालन झालं पाहिजे. पण काही लोक म्हणतात की आम्ही या आदेशाचं पालन करणार नाही मग तेढ कोण निर्माण करतंय. आदेशाचं पालन करा म्हणणारे की करणार नाही म्हणणारे? 

महाराष्ट्र सरकार हे जगातलं एकमेव सरकार आहे जिथे जनता म्हणते कायद्याचे पालन झाले पाहिजे आणि सरकार म्हणते कायद्याचे पालन करणार नाही किमान या गोष्टीसाठी जागतिक  स्तरावर महाविकास आघाडी सरकारचा सत्कार व्हायला हवा. दुसरा प्रश्न विचारला जातो महागाई आणि पेट्रोल-डिझेल दरवाढ या विषयावर राजसाहेब का बोलत नाही, आमचा त्यांना प्रश्न आहे सगळ्यावर आम्हीच बोलायचं तर मग तुम्ही काय फक्त टेंडर मधील कमिशन खाणार? आणि तुमचे संसदेत निवडून गेलेले खासदार काय अंडी उबवणार?राज्यसरकारनी महागाई कमी करण्यासाठी काय उपाय योजना केल्या?मुळात ज्या राज्याचे मुख्यमंत्री दोन वर्षांनी मंत्रालयात गेले म्हणून हेडलाईन होते तिथून काय अपेक्षा ठेवणार? कोविडकाळात सरकार सर्वसामान्यांच्या प्रश्नांविषयी बेदखल होतं, मुख्यमंत्री कुणाला भेटत नव्हते, तेव्हा प्रश्न मार्गी लागावे म्हणून लोक कृष्णकुंजवर यायचे. खरे सांगायचे तर मुख्यमंत्र्यांनी कोविडकाळाचं कारण पुढे करून लोकांची सहानुभूती मिळवण्याच प्रयत्न केला. आणखी एक आरोप म्हणजे राजसाहेब दुसऱ्या कुणाची तरी भाषा बोलतात त्याबद्दल एवढंच सांगीन की "राजसाहेब कुण्याच्या खांद्यावरून ना कधी बंदूक चालवत ना कुणाला स्वतःचा खांदा बंदूक चालवायला देतात. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी एवढ्या कोलांट उड्या मारल्यात की मनसेबद्दल बोलायचा नैतिक अधिकार एकालाही नाही. राहता राहिला प्रश्न भाजप आणि मनसे युतीचा तर काळाच्या पोटात काय दडलंय हे कोणीही सांगू शकत नाही! 

(लेखक हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आहेत )

Web Title: mns leader sandeep deshpande article about religious rift and politics of maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.