'म्हणूनच मंत्रालयाचा नवीन पत्ता आधी कृष्णकुंज आणि आता शिवतीर्थ', मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 02:48 PM2022-01-06T14:48:56+5:302022-01-06T14:49:06+5:30

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यापासून फार कमी वेळा मंत्रालयात गेले आहेत. त्यांच्या मंत्रालयात न जाण्यावरुन अनेकदा विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. मनसेनेही याच मुद्द्यावरुन मुख्यमंत्री ठाकरेंना टोला लगावलाय.

MNS leader Sandeep Deshpande slams CM Uddhav Thackeray over his attendence in 'Mantralay' | 'म्हणूनच मंत्रालयाचा नवीन पत्ता आधी कृष्णकुंज आणि आता शिवतीर्थ', मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला

'म्हणूनच मंत्रालयाचा नवीन पत्ता आधी कृष्णकुंज आणि आता शिवतीर्थ', मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला

Next

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे हे नेहमीच सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी शेलक्या शब्दांत मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. संदीप देशपांडेंनी ट्वीटमधून हा टोला लगावला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी शेअर केलेल्या फोटोची सध्या चर्चा होत आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यापासून फार कमी वेळा मंत्रालयात गेले आहेत. त्यांच्या मंत्रालयात न जाण्यावरुन अनेकदा विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. मनसेनेही याच मुद्द्यावरुन मुख्यमंत्री ठाकरेंना टोला लगावला आहे. मनसे नेते संदीप देशपांडेंनी आज केलेलं ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या ट्विटमध्ये तीन दरवाज्यांचा फोटो दाखवण्यात आला आहे. या दरवाज्यांना जाळं-जळमटं लागलेली आहेत. 

या फोटोसोबत केलेल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, 'म्हणूनच मंत्रालयाचा नवीन पत्ता आधी कृष्णकुंज आणि आता शिवतीर्थ आहे.' या फोटोत सर्वात वरती ओळखा पाहू? हे ऐतिहासिक दालन कोणाचे? अशी ओळ लिहिलेली आहे. त्याखाली प्रत्येक दारावर सहावा मजला असे लिहिलेले आहे आणि कोपऱ्यात वर्ष 2020, 2021 आणि 2022 लिहिलेले आहे.

Web Title: MNS leader Sandeep Deshpande slams CM Uddhav Thackeray over his attendence in 'Mantralay'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.