“एक बरं झालं मुख्यमंत्र्यांची कोरोनाची भीती गेली आणि ते बाहेर पडले,” मनसेनं डिवचलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 03:21 PM2022-06-23T15:21:55+5:302022-06-23T15:22:32+5:30

मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे अपक्ष मिळून ४२ आमदार शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत.

mns leader sandeep deshpande targets cm uddhav thackeray maharashtra political crisis eknath shinde | “एक बरं झालं मुख्यमंत्र्यांची कोरोनाची भीती गेली आणि ते बाहेर पडले,” मनसेनं डिवचलं

“एक बरं झालं मुख्यमंत्र्यांची कोरोनाची भीती गेली आणि ते बाहेर पडले,” मनसेनं डिवचलं

Next

मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे अपक्ष मिळून ४२ आमदार शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे केवळ १८ आमदार असल्याचं कळतंय. गुवाहाटीच्या हॉटेलमधून एकनाथ शिंदे यांनी आमदारांचे शक्तीप्रदर्शन केले. दरम्यान, राज्यातील परिस्थितीवरून आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

“फेसबुक लाईव्ह, कोमट पाणी, सोशल डिस्टन्स, सहानभूती, नुसत्या शाब्दिक कोट्या, भावनिक गोष्टी, विक्टिम कार्ड यांनीच गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राची वाट लावली. असो या सगळ्यात एक बर झालं मुख्यमंत्रांची करोनाची भीती गेली आणि ते बाहेर पडले,” असं म्हणत संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.


एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीची कल्पना आधीच होती
एकनाथ शिंदे सहा महिन्यापासून बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याचं समोर आले. इतकेच नाही उद्धव ठाकरे यांना ५-६ वेळा गृहमंत्रालयाकडून शिंदे यांच्या हालचालीची माहिती देण्यात आली होती. परंतु इंटेलिजन्सचा रिपोर्ट मिळूनही उद्धव ठाकरे यांनी दुर्लक्ष केल्याने शिवसेनेवर ही परिस्थिती आल्याचं सांगितले जात आहे. गुप्तचर विभागाने महाराष्ट्रातील राजकीय संकटाची कल्पना २ महिन्यापूर्वीच सरकारला दिली होती. परंतु कुठलीही कारवाई झाली नाही असा दावा पोलीस सूत्रांनी केला आहे. २ महिन्यापूर्वीच एकनाथ शिंदे यांच्यासह ८ ते १० आमदार विरोधी पक्षाच्या संपर्कात असल्याची माहिती देण्यात आली होती. 

Read in English

Web Title: mns leader sandeep deshpande targets cm uddhav thackeray maharashtra political crisis eknath shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.