“… आणि तुमच्यासारखे आईतखाऊ मुंगळे लगेच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला चिकटले”; मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 10:22 PM2022-06-04T22:22:54+5:302022-06-04T22:24:49+5:30
पवारांची स्तुती करताना उद्धव ठाकरे म्हणाले होते, "साखरेतला गोडवा पवार साहेबांनी राजकारणात आणला आहे..."
पुण्यातील वसंतदादा साखर इन्स्टिट्युट येथे आज साखर परिषद-२०२२ चे आयोजन करण्यात आले. यावेळी, परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खास आपल्या शैलीत, "साखरेतला गोडवा पवार साहेबांनी राजकारणात आणला आहे", असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार यांचे कौतुक केले. आता हाच धागा धर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.
खरे तर, सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अथवा कार्यकर्त्ये, शिवसेना अथवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची अथवा त्यांच्यावर निशाणा साधण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. आता शालिनी ठाकरे यांनी एक ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. "साखरेतला गोडवा पवार साहेबांनी राजकारणात आणला आणि सत्तेच्या हव्यासापोटी तुमच्यासारखे आईतखाऊ मुंगळे लगेचच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला चिकटले.......!!! मैं तेरे प्यार में क्या क्या ना बना...," असे ट्विट शालिनी ठाकरे यांनी केले आहे.
साखरेतला गोडवा पवार साहेबांनी राजकारणात आणला आणि सत्तेच्या हव्यासापोटी तुमच्यासारखे आईतखाऊ मुंगळे लगेचच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला चिकटले.......!!!
— Shalini Thackeray (@ThakareShalini) June 4, 2022
मैं तेरे प्यार में क्या क्या ना बना...#लालचीमुख्यमंत्री#बेगडीहिंदुत्व#सत्य_नहीं_झुकेगा#RajThackeray@mnsadhikrutpic.twitter.com/TWBOreqsSZ
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? -
पवारांची स्तुती करताना उद्धव ठाकरे म्हणाले होते, साखरेतला गोडवा पवार साहेबांनी राजकारणात आणला आहे आणि सगळ्या पक्षांचे नेते पक्षीय जोडे काढून, राज्य आणि देशाच्या हिताचा विचार करताहेत ही निश्चित चांगली बाब आहे. साखर उद्योग हा महाराष्ट्राचा मुख्य उद्योग आहे. साखरेचे महत्व लक्षात घेता पुढील नियोजन करणे गरजेचे आहे.