“महाभकास आघाडीचे गणित चुकले आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री तोंडावर आपटले”
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 03:05 PM2022-06-21T15:05:13+5:302022-06-21T15:15:34+5:30
मनसेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला
राज्यात विधान परिषद निकालात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्यानंतर शिवसेनेतील नाराजी आता उघड झाली आहे. निकाल लागल्यानंतर सोमवार संध्याकाळपासूनच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे नॉट रिचेबल होते. त्यांच्यासह शिवसेनेचे अनेक आमदार गुजरातला थांबल्याचे आता समोर आले आहे. दरम्यान, या सर्व घडामोडींनंतर मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे.
“सबको समझा. आपको समझा क्या..?? पुन्हा एकदा महाभकास आघाडीचे गणित चुकले आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री तोंडावर आपटले. आता कोण एकटे पडले हे समजले असेलच. तुमच्यात एकजूट किती आहे हे सगळ्यांना समजले. पण तुम्हाला कधी समजणार?,” असं म्हणत शालिनी ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
सबको समजा....आपको समजा क्या.....??
— Shalini Thackeray (@ThakareShalini) June 21, 2022
पुन्हा एकदा महाभकास आघाडीचे गणित चुकले आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री तोंडावर आपटले....आता कोण एकटे पडले हे समजले असेलच....
तुमच्यात एकजूट किती आहे हे सगळ्यांना समजले..... पण तुम्हाला कधी समजणार.....?#विधानपरिषदनिवडणूक2022#udhavthackeray
एकनाथ शिंदे सूरतमध्ये
सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे असल्याचे सांगण्यात येत आहे. या हॉटेलबाहेर आता गुजरात पोलिसांनी देखील बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सूरत हा भाजपाच्या बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील काही आमदार संपर्काच्या बाहेर असल्याची कुणकुण लागताच वर्षा बंगल्यावर लागताच सर्व आमदारांची बैठक बोलावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबईहून रात्री दहा शिवसेनेचे आमदार सूरतकडे रवाना झाले. रात्री दीडला एकनाथ शिंदे काही आमदारांसह सूरतकडे रवाना झाले.