“जसे बाळासाहेबांचे व्हिडीओ बनवून सभेला गर्दी वाढवण्याचा प्रयत्न करता तसा…”

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 02:04 PM2022-05-10T14:04:40+5:302022-05-10T14:05:29+5:30

शालिनी ठाकरेंचा शिवसेनेवर निशाणा.

mns leader shalini thackeray targets shiv sena uddhav thackeray balasaheb thackeray rally | “जसे बाळासाहेबांचे व्हिडीओ बनवून सभेला गर्दी वाढवण्याचा प्रयत्न करता तसा…”

“जसे बाळासाहेबांचे व्हिडीओ बनवून सभेला गर्दी वाढवण्याचा प्रयत्न करता तसा…”

googlenewsNext

१४ मे रोजी उद्धव ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत. “आता सभेला तर सुरुवात झालेलीच आहे, १४ तारखेला तर मी सभा घेतोच आहे, पण ही सभा म्हणजे उठसूठ इकडे वार तिकडे वार असं नाही करणार, जे काय माझ्या मनात आहे ते मी बोलणार आहे. माझं काही तुंबलेलं नाही, पण मनामध्ये ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत,” असं उद्धव ठाकरे एका सभेदरम्यान म्हणाले होते. दरम्यान, शिवसेनेनं या सभेपूर्वी काही व्हिडीओदेखील शेअर केले आहेत. तसंच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसह हिंदुत्वाचा खरा विचार ऐकायला यायलाच पाहिजे असं त्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

दरम्यान, यावरून मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “जसे बाळासाहेबांचे व्हिडीओ बनवून सभेची गर्दी वाढविण्याचा केविलवाणा प्रयत्न करता तसाच बाळासाहेबांची भोंग्याची भूमिका पण प्रत्यक्षात उतरवा.....कळू दे की जनतेला एकदाचे तुमचे कडवे हिंदुत्व…!,” असं म्हणत त्यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला.


१४तारखेला  मनातलेबोलणार
मुंबई महापालिकेच्या सर्वांसाठी पाणी या नवीन धोरणाचे कौतुक आहे. हे पाणी मिळणे म्हणजे अधिकृत असण्याचा पुरावा नाही तर ही माणुसकी आहे. हक्काचे पाणी मिळाले पाहिजे म्हणून ही योजना आहे, असे सांगत आता सभा सुरू होत आहेत. १४ तारखेला सभेत जे मनात आहे ते मी बोलणार. माझे काही तुंबलेले नाही. पण मनामध्ये आहे त्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत, असेही उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.

Web Title: mns leader shalini thackeray targets shiv sena uddhav thackeray balasaheb thackeray rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.