“नमाज पढण्यासाठी भोंगे कशाला हवेत”; मुस्लिम नगरसेवकांचा राज ठाकरेंना पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 01:09 PM2022-04-06T13:09:13+5:302022-04-06T13:10:11+5:30

मशिदीवरील भोंगा प्रकरणावरुन मनसेत दोन गट पडल्याचे दिसत असून, कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण असल्याचे सांगितले जात आहे.

mns nashik corporators support raj thackeray over mosque bhonga issue and said why the buzzer to pray | “नमाज पढण्यासाठी भोंगे कशाला हवेत”; मुस्लिम नगरसेवकांचा राज ठाकरेंना पाठिंबा

“नमाज पढण्यासाठी भोंगे कशाला हवेत”; मुस्लिम नगरसेवकांचा राज ठाकरेंना पाठिंबा

googlenewsNext

नाशिक: मनसेच्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या भाषणाचे अजूनही राजकीय वर्तुळात पडसाद उमटताना पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार निशाणा साधताना मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला. यावरून राजकारण तापत असून, मनसेतील कार्यकर्त्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. पुण्यातून राज ठाकरे यांना या मुद्द्यावरून विरोध होत असला, तर काही मुस्लीम नगरसेवक राज ठाकरे यांच्या निर्णयाला पाठिंबा देत असल्याचे सांगितले जात आहे. 

मनसेचे नाशिकमधील नगरसेवक सलीम शेख यांच्यासह इतर मुस्लिम नगरसेवकांनी राज ठाकरे यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला असून, लवकरच मुंबईत येऊन राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मशिदींवर भोंगे लावलेच नसते, तर हा प्रश्नच उपस्थित झाला नसता. मशिदींनी न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन नगरसेवक सलीम शेख यांनी केल्याचे सांगितले जात आहे. तत्पूर्वी, राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर झालेल्या सभेत मशिदीवरील भोंगे खाली उतरवावेच लागतील. ज्या मशिदीच्या बाहेर भोंगे लागतील त्याच्यासमोर भोंग्यांच्या दुप्पट स्पीकरवर हनुमान चालिसा लावा. मी धर्मांध नाही. धर्माभिमानी आहे, असे राज ठाकरे यांनी नमूद केले होते. 

मशिदीवरील भोंगा प्रकरणावरून मनसेत दोन गट

मशिदीवरील भोंगा प्रकरणावरून मनसेतही दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातारवण निर्माण झाले आहे. पुण्यात मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. वसंत मोरे यांच्या कात्रज प्रभागात मुस्लिमांची ३ हजार ८०० मते आहेत आणि हीच मते गेमचेंजर ठरतात. त्यामुळे ते राज ठाकरे यांच्या भूमिकेशी ते सहमत असल्याचे म्हटले जात आहे. भोंग्याच्या प्रकरणावरून पुण्यात मनसेच्या मुस्लीम कार्यकर्त्यांनी राजीनामाही दिला आहे. तर या उलट नाशिकमधील नगरसेवकांनी राज ठाकरे यांना पाठिंबा दर्शवला आहे. 
 

Web Title: mns nashik corporators support raj thackeray over mosque bhonga issue and said why the buzzer to pray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.